Singer | ‘या’ गायकाचा कॉन्सर्ट स्थगित, भारत आणि कॅनडा वादाचा मोठा फटका, वाचा काय घडले

भारत आणि कॅनडामध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. याचा फटका आता गायकांना बसताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच शुभनीत सिंग याचा भारत दाैरा रद्द करण्यात आला. शुभनीत सिंग याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठा वाद निर्माण झाला.

Singer | या गायकाचा कॉन्सर्ट स्थगित, भारत आणि कॅनडा वादाचा मोठा फटका, वाचा काय घडले
| Updated on: Oct 08, 2023 | 8:51 PM

मुंबई : भारत आणि कॅनडामध्ये सध्या मोठा वाद बघायला मिळतोय. भारत (India) आणि कॅनडा वादाचा मोठा फटका हा आता काही गायकांना बसताना दिसतोय. कॅनडास्थित असलेल्या गायकांची भारतामध्ये मोठी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. दुसरीकडे जे भारतीय गायक आहेत त्यांची देखील कॅनडामध्ये जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कारण कॅनडाला मिनी भारत म्हणून ओळखले जाते. यामुळे भारतीय पंजाबी गायकांचा कॅनडामध्ये तगडा चाहता वर्ग बघायला मिळतो.

आता पंजाबी गायक गुरदास मान याला मोठा फटका बसलाय. गुरदास मान याची फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. गुरदास मान याचा कॅनडामध्ये कॉन्सर्ट ठेवण्यात आला. मात्र, आता भारत आणि कॅनडा वादाचा मोठा फटका हा गुरदास मान याला बसल्याचे दिसतंय.

गुरदास मान याचा कॅनडामधील कॉन्सर्ट हा काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आलाय. यामुळे गुरदास मान याला मोठा फटका बसल्याचे दिसतंय. गुरदास मान याचा कॉन्सर्ट स्थगित झाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. भारत आणि कॅनडा वादानंतर एखाद्या गायकाचा कॉन्सर्ट स्थगित होणे किंवा रद्द होणे ही काही पहिली वेळ अजिबातच नाहीये.

यापूर्वी कॅनडास्थित पंजाबी गायक शुभनीत सिंग ऊर्फ शुभचा भारतातील कॉन्सर्ट रद्द करण्यात आला. खलिस्तानला पाठिंबा दिल्याचा गंभीर आरोप हा शुभनीत सिंग याच्यावर करण्यात आला. त्यानंतर त्याचा भारतामधील कॉन्सर्ट रद्द करण्यात आला. याचा मोठा फटका शुभनीत सिंग याला बसला. चाहत्यांनी खरेदी केलेले तिकिटांचे पैसेही त्याला वापस द्यावे लागले.

इतकेच नाही तर आपला भारत दाैरा रद्द झाल्यानंतर शुभनीत सिंग याने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. शुभनीत सिंग याने आपल्या पोस्टमध्ये थेट म्हटले होते की, अत्यंत निराश, भारतामध्ये परफॉर्म करण्यास आपण खूप जास्त इच्छुक असल्याचे सांगताना देखील शुभनीत सिंग हा दिसला. आता या वादाचा मोठा फटका हा गायकांना बसताना दिसतोय.

कॅनडामधील कॉन्सर्ट स्थगित झाल्यानंतर पंजाबी गायक गुरदास मान याने काही भाष्य केले नाहीये. मात्र, गुरदास मान याचा कॉन्सर्ट स्थगित झाल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा ही बघायला मिळतंय. पुढील काही दिवसांमध्ये जर हा वाद वाढतच राहिला तर याचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जातंय.