AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mallika Sherawat : युरोपियन पुरुष हे भारतीय पुरुषांपेक्षा..मल्लिका शेरावत श्वेता तिवारीसाठी करणार एक खास काम

मल्लिका शेरावतच्या 'द ट्रेटर्स 2' मधील एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. श्वेता तिवारीशी बोलताना तिने युरोपीय पुरुषांची भारतीय पुरुषांशी तुलना करत, युरोपीय पुरुष अधिक चांगले असल्याचे सूचित केले. या विधानामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Mallika Sherawat : युरोपियन पुरुष हे भारतीय पुरुषांपेक्षा..मल्लिका शेरावत श्वेता तिवारीसाठी करणार एक खास काम
Mallika Sherawat and Shweta Tiwari
| Updated on: Aug 21, 2026 | 5:38 PM
Share

‘द ट्रेटर्स’ सीजन 2च्या प्रीमियरपासूनच हा शो चर्चेत आहे. त्यातच आता अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या (Mallika Sherawat) एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. या शोच्या सहाव्या एपिसोडमध्ये मल्लिकाने भारतीय पुरुषांच्या तुलनेत युरोपीय पुरुष अधिक चांगले असल्याचं सूचित केलं. श्वेता तिवारीशी बोलताना तिने हे विधान केलं. मात्र तिच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर खळबळ माजली असून नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खरंतर श्वेता तिवारीसाठी मॅचमेकरची भूमिका निभावण्याचा मल्लिका शेरावतचा मनसुबा होता पण युरोपीय पुरूष आणि भारतीय पुरूशांची तिने तुलना केली, जे अनेकांना रुचलं नाही. त्यावरून बरीच टीका होत्ये.

जेव्हा मल्लिका, श्वेता आणि रिया चक्रवर्ती बिलियर्ड्स रूममध्ये गप्पा मारत होत्या, तेव्हाच हा विषय निघाला. “ मी वचन दिलंय की तिची भेट एका चांगल्या युरोपीय पुरुषाशी करून देईन, जो तिच्यावर खूप प्रेम करेल आणि तिचे कौतुक करेल” असं मल्लिकाने म्हटलं. मात्र यानंतर रिया चक्रवर्तीने मल्लिकाला थेट विचारलं की, “डेटिंगच्या बाबतीत युरोपीय पुरुष भारतीय पुरुषांपेक्षा चांगले असतात का?”  तिचा तो प्रश्न ऐकून मल्लिका आश्चर्यचकित झाली. “ हा काही विचारण्यासारखा प्रश्न आहे का? तुझं डोकं खराब झालं आहे का? ” असं तिने उलट रियालाच विचारलं, त्यावर रेहा “हो” असं म्हणाली. मात्र ते ऐकून पुढे मल्लिका म्ह णाली, “मी नक्कीच व्यवस्था करेन”. त्यांचं हे बोलणं ऐकून श्वेताला मात्र हसू अनावर झालं. तुम्ही माझ्यामागे का लागलाय, असा प्रश्न तिने मजेत विचारला.

सोशल मीडियावर यूजर्स नाराज

मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी नाराज झाले आहेत. काही यूजर्सनी मल्लिकाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. “तू सर्व भारतीय पुरुषांना एकाच श्रेणीत तोलू नकोस, तस न करताही तुला युरोपीय पुरुष आवडू शकतात ” असं एकाने लिहीलं.  तर “या तुलनेला काहीच अर्थ नाही. चांगली आणि वाईट माणसं प्रत्येक ठिकाणी असतात” असं दुसऱ्या युजरने तिला सुनावलं.  आणखी एका यूजरनेही मल्लिकाच्या वक्तव्यावर उपरोधिक टिप्पणी केली. “मल्लिका म्हणत्ये की युरोपीय पुरुष चांगले असतात, जसं काही तिने ग्लोबल डेटिंगच सर्व्हेच केलाय ना ” असा टोमणा तिने मारला.  “ युरोपीय पुरुष भारतीय पुरुषांपेक्षा चांगले असतात का? हे तर खूच मोठं विधान आहे, असं बोलणं योग्य नाही ” असं म्हणत आणखी एका युजरने मल्लिकावर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, ‘द ट्रेटर्स’ सीझन 2 मध्ये सतत स्पर्धक बाहेर होत आहेत, कारण त्यांच्या गटात असलेल्या फसवणूक करणाऱ्या स्पर्धकांची ओळख पटवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?