AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | पापाराझी याच्यासोबत रणबीर कपूर याने केले ‘हे’ कृत्य, व्हिडीओ व्हायरल, थेट लिफ्टमध्येच…

रणबीर कपूर याने बाॅलिवूडमध्ये मोठा काळ गाजवलाय. रणबीर कपूर याने अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. रणबीर कपूर याच्यावर काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप करण्यात आले. रणबीर कपूर यामुळे चर्चेत आहे.

Video | पापाराझी याच्यासोबत रणबीर कपूर याने केले 'हे' कृत्य, व्हिडीओ व्हायरल, थेट लिफ्टमध्येच...
| Updated on: Oct 19, 2023 | 3:35 PM
Share

मुंबई : रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असणारा बाॅलिवूड (Bollywood) अभिनेता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. महादेव ॲप प्रकरणात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर या ॲपचे प्रमोशन करण्यासाठी त्याने तगडी रक्कम घेतल्याचे देखील सांगितले जातंय. रणबीर कपूर याचे नाव महादेव ॲप (mahadev app) प्रकरणात आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

इतकेच नाही तर या प्रकरणात रणबीर कपूर याची चाैकशी ही थेट ईडीकडून केली जाणार आहे. रणबीर कपूर याला 6 आॅक्टोबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर व्हायचे होते. मात्र, रणबीर कपूर याने ईडीला मेल करत काही दिवसांचा वेळ मागून घेतला. रणबीर कपूर याला ईडीने थेट समन्स बजावला आहे. फक्त रणबीर कपूर हाच नाही तर अजूनही काही कलाकारांची यामध्ये नाव आलीयेत.

रणबीर कपूर याचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. रणबीर कपूर याचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. नेहमीच रणबीर कपूर हा पापाराझी यांच्यावर चिडचिड करताना दिसतो. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा त्यांना फोटोसाठी पोझ न देता निघून जाताना देखील दिसतो.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काहीतरी वेगळेच बघायला मिळतंय. रणबीर कपूर हा गाडीमधून उतरतो. यावेळी रणबीर कपूर याला पाहून पापाराझी हे फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसत आहेत. मात्र, रणबीर कपूर हा थेट पुढे जाताना दिसतोय. रणबीर कपूर याच्या पुढे एक पापाराझी येतो. या पापाराझीला ढकलत थेट रणबीर कपूर लिफ्टमध्ये घेऊन जातो.

पुढे तो पापाराझी तिथून निघण्याचा प्रयत्न करतो. मात्र, रणबीर कपूर हा त्याच्या पुढे थांबतो आणि त्याला लिफ्टमधून बाहेर पडू देत नाही. पहिल्यांदाच रणबीर कपूर हा पापाराझी यांच्यासोबत अशाप्रकारे मस्ती करताना दिसतोय. यावेळी उपस्थित लोक हसताना देखील दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यावर कमेंट करत एकाने थेट लिहिले की, रणबीर कपूर याने पापाराझीचे किडनॅप केले.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.