AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिश्नोई गँगच्या धमकीनंतर ‘तो’ हैराण करणारा निर्णय?, सलमान खान ‘बिग बॉस 18’ला…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या सातत्याने मिळताना दिसत आहेत. त्यामध्येच आता बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलीये.

बिश्नोई गँगच्या धमकीनंतर 'तो' हैराण करणारा निर्णय?, सलमान खान 'बिग बॉस 18'ला...
Salman Khan
| Updated on: Oct 18, 2024 | 2:08 PM
Share

‘बिग बॉस सीजन 18’ला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच चर्चेत आहे. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसच्या घरात दाखल झाले होते. मात्र, अचानक ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक मोठे खुलासे करताना गुणरत्न सदावर्ते हे दिसले. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान हा बिग बॉसला होस्ट करताना दिसतोय. मध्यंतरी चर्चा होती की, सलमान खान हा बिग बॉस 18 ला होस्ट करताना दिसणार नाहीये. मात्र, त्यानंतर लगेचच सलमान खान हा आगामी सीजनचा प्रोमो शूट करताना दिसला. धमाकेदार असा लीक सलमान खान याचा बिग बॉस 18 मध्ये दिसतोय.

बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्यावेळी गोळीबार करण्यात आला. त्यावेळी सलमान खान हा बिग बॉस सीजन 18 चे विकेंडच्या वारचे शूटिंग करत होता. त्याला जसे समजले की, बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला तसेच त्याने थेट लीलावती रूग्णालय गाठले. हेच नाही तर स्वत:च्या जीवाला धोका असताना देखील सलमान खान बाबा सिद्दीकी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचला.

सतत सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. बिश्नोई गँगकडून आज सकाळी देखील सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली. सलमान खानच्या घराची सतत रेकी बिश्नोई गँगकडून केली जातंंय. बिश्नोई गँगनेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. जे सलमान खानच्या जवळ असतील ते आपले दुश्मन असल्याचे थेट सांगताना बिश्नोई गँगकडून सांगण्यात आलंय.

बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या हत्येचा प्लॅनिंग सतत बनवले जातंय. आता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ ही करण्यात आलीये. मुंबई पोलिस त्याच्या घराबाहेर मोठ्या संख्येने आहेत. सलमान खानच्या पनवेल येथील फॉर्महाऊसची देखील सुरक्षा वाढवली आहे. फॉर्महाऊसच्या आतमध्ये आणि बाहेरही पोलिस आहेत.

सलमान खानच्या सुरक्षेच्या कारणामुळे तो बिग बॉस सीजन 18 चे देखील काही दिवस शूटिंग करणार नसल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले जातंय. काही दिवस अनिल कपूर किंवा फराह खान हे शूटिंग करणार असल्याची चर्चा आहे. अगदी गुप्त पद्धतीने पुढील काही दिवसांनंतर सलमान खान बिग बॉसच्या शूटिंगला येईल असे सांगण्यात येतंय. मात्र, सध्या तरी सुरक्षेच्या कारणामुळे तो बिग बॉसचे करू शकणार नसल्याचे सांगण्यात आलंय.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...