AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

750 रुपयांत लग्न; मनिषा कोईरालामुळे वेगळा राहण्याचा निर्णय; नाना पाटेकरांच्या पत्नीला पाहिलं का? ज्या आजही त्यांच्यासोबत राहत नाही

नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती या देखील अभिनेत्री असून त्यांनीही एका चित्रपटात काम केलं आहे. त्यांच्याबद्दल फारसं लोकांना माहित नाही. पण एक अफवा आणि या दोघांमध्ये दुरावा आला. आजही हे दोघे वेगळे राहतात. नेमकी काय आहे यामागची गोष्ट?

750 रुपयांत लग्न; मनिषा कोईरालामुळे वेगळा राहण्याचा निर्णय; नाना पाटेकरांच्या पत्नीला पाहिलं का? ज्या आजही त्यांच्यासोबत राहत नाही
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 21, 2024 | 3:02 PM
Share

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना कोणत्या वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खास ओळख आहे. त्यांची शैली, त्यांचा आवाज तसेच त्यांची डायलॉग म्हणण्याची पद्धत अगदी प्रसिद्ध आहेत. नानांनी हिंदी व मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केलं आहे.

नानांची आणि नीलकांती यांची भेट कशी झाली?

नानांच्या अभिनयासोबतच साधं राहणीमान, गावाची ओढ यासर्वांबद्दलच नेहमी चर्चा होताना दिसते. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मात्र फारसं कोणाला माहित  नाही किंवा त्याबद्दल तेवढी चर्चा केली जात नाही.

नाना पाटेकर यांच्या पत्नीचं नाव आहे नीलकांती. पण ते दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. घटस्फोट न घेता दोघेही वेगळे राहत आहेत. नाना पाटेकर यांच्या पत्नीचे नाव नीलकांती आहे. या दोघांना मल्हार हा मुलगा आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून नाना आणि नीलकांती वेगळे राहतात. या दोघांची पहिली भेट थिएटरमध्ये काम करताना झाली होती.

अवघ्या 750 रुपयांत लग्न केलं होतं

नीलकांती देखील ऐकेकाळी अभिनेत्री होत्या. थिएटर करत असताना त्यांची आणि नानांची भेट झाली. त्यावेळी नीलकांती बँकेत अधिकारी होत्या आणि त्यांना 2500 रुपये महिना पगार मिळायचा. दुसरीकडे नाना पाटेकर एका शोमधून 50 रुपये कमावायचे.

प्रेमात पडल्यावर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचा खर्च अवघा 750 रुपये झाला होता. अगदी साध्या पद्धतीने त्यांनी लग्न केलं होतं. तर ते दोघे हनिमूनसाठी पुण्याला गेले होते.

मोठ्या मुलाचं निधन 

नीलकांती यांनाही अभिनयाची आवड होती. पण लग्नानंतर त्यांनी नोकरी चालू ठेवली. त्यांनी फक्त एकाच चित्रपटात काम केलं होतं. ‘आत्मविश्वास’ असं त्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला होता.

नीलकांती यांनी नाना पाटेकरांना अभिनयात करिअर करण्याठी पाठिंबा दिला. लग्नानंतर काही वर्षांनी नाना व नीलकांती आई-बाबा झाले. पण त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा असताना त्याचं निधन झालं. त्यानंतर त्यांना दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी मल्हार ठेवलं.

मनीषा कोईरालासोबत नाव जोडलं गेलं अन्…

मोठ्या मुलाच्या निधनाचा नाना पाटेकर यांना धक्का बसला होता. काही वर्षांनी पती-पत्नीमध्येही मतभेद सुरू झाले. रिपोर्ट्सनुसार  काही वर्षांनी नाना पाटेकर यांचे नाव मनीषा कोईरालासोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा येऊ लागल्या होत्या. त्यानंतर नीलकांती आणि नाना यांच्यातील दुरावा वाढतच गेला. इतक्या वर्षांनंतरही नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी घटस्फोट न घेता वेगळेच राहत आहेत.

दरम्यान नाना पाटेकर आजही चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. एवढच नाही तर त्यांचा स्पष्टवक्तेपण आणि साध-सरळ राहणीमान याची आजही तेवढीच चर्चा केली जाते. तसेच त्यांच्या अनेक मुलाखतींमधून त्याच्या लहानपणापासूनचे किस्सेही आता ऐकायला मिळतात.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...