
Bollywood Actress Life: बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण करण्यासाठी अनेक तरुण मयानगरी मुंबईत पाय ठवतात. पण बॉलिवूडमध्ये अशा देखील अनेक अभिनेत्री आहे, ज्यांनी झगमगत्या विश्वात काम तर केलं, पण स्वतःची भक्कम ओळख निर्माण करु शकल्या नाहीत. असं असताना देखील अनेक चाहते अभिनेत्रींना विसरत नाही. अशीच एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहे आणि ती म्हणजे अभिनेत्री पेरीजाद जोराबियन… सांगायचं झालं तर, पेरीजाद जोराबियन हिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अभिनेता सालमान खान यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण आता अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून फार दूर आहे.
पेरीजाद जोराबियन हिने 1998 मध्ये टीव्ही विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर पेरीजाद जोराबियन हिने 2001 मध्ये बॉलिवूडच्या दिशेने स्वतःचा मोर्चा वळवला…. पेरीजाद जोराबियन हिच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘बॉलिवूड कॉलिंग’ असं होतं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्री मॉर्निंग रागा, एक अजनबी, जॉगर्स पार्क, धूम आणि मुंबई मॅटिनी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं.
पेरीजाद हिने सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत ‘सलाम ए इश्क’ सिनेमात देखील काम केलं आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी अप कभी डाऊन’ सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर अभिनेत्री कोणत्याच सिनेमात दिसलीन नाही.
आज पेरीजाद बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तर, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम तिच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पेरीजाद हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2006 मध्ये बांधकाम उद्योजक बोमन रुस्तम ईराणी यांच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर अभिनेत्रीने एक मुलगा आणि मुलीचं जगात स्वागत केला. त्यानंतर अभिनेत्री तिचा संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला.
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी पेरिजाद एका चिकन ब्रँडची मालकीण देखील आहे. तिच्या चिकन ब्रँडचे नाव ‘झोराबियन’ आहे, या ब्रँड अंतर्गत पेरिजाद पॅक केलेलं चिकन विकते. पेरिझाद अनेकदा तिच्या कुटुंबासह, मित्रांसोबत आणि मुलांसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते. तिच्या अकाउंटवर तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो आहेत आणि ते पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की 51 व्या वर्षीही ती खूप सुंदर आहे.