‘मी भेटायला येतोय, पण त्यासाठी…’, हॉलिवूड अभिनेता असल्याचं सांगून वयोवृद्ध महिलेसोबत केलं असं कृत्य
'मी भेटायला येताय, पण त्यासाठी...', हॉलिवूड अभिनेता असल्याचं सांगत 'त्या' व्यक्तीने वयोवृद्ध महिलेसोबत असं काय केलं? ज्यामुळे पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण... सध्या सर्वत्र घडलेल्या घटनेची चर्चा...

गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. आता देखील फसवणुकीचं मोठं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने हॉलीवूड अभिनेता असल्याचं सांगून वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हॉलीवूड अभिनेता असल्याचे सांगून एका वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगाने फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी वयोवृद्ध महिलेच्या लंडन येथे राहणाऱ्या मुलीच्या ऑनलाइन तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, ऑनलाइन फसवणुकीसाठी पहिल्यांदाच एका हॉलीवूड अभिनेत्याच्या नावाचा गैरवापर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महिलेची मुलगी स्नेहा भावनानी ही तिच्या पतीसोबत लंडन येथे राहत असून एका खासगी कंपनीत पब्लिशिंगचे काम करते. तिची आई डाफनी रामचंद्र कामत ही अंधेरीतील सातबंगला, नाना-नानी पार्क परिसरात राहते. डाफनी यांचं वय 69 वर्ष आहे. डाफनी यांची प्रकृती ठीक नसल्याने तिचे मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरू आहेत.
तिला तिच्या बँकेचा व्यवहार मेलद्वारे पाठविला जातो… मात्र आजारी असल्याने ती मेल पाहत नाही… त्यामुळे स्नेहा भावनानी याच बँकेच्या सर्व व्यवहार पाहतात… 30 जूनला स्नेहा या लंडनमध्ये असताना तिला तिच्या आईच्या बँक खात्यातून 65 हजार रुपये डेबिट झाल्याचे दिसून आलं.
संबंधित रक्कम अशा नाहर या व्यक्तीच्या डेहरादून येथील बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. त्यामुळे तिने तातडीने तिच्या आईला संबंधित व्यवहाराबाबत विचारणा केली होती. या वेळी तिने तिला एका कियानो चाल्स रिव्हज नावाच्या हॉलीवूड अभिनेत्याशी संबंधित समाजमाध्यमांवर मेसेज आला होता.
संबंधित व्यक्तीने स्वतःला हॉलीवूडचा अभिनेता असल्याचे सांगून वृद्ध महिलेला भेटण्यासाठी भारतात येणार आहे. भारतात येण्यासाठी इंडियन करन्सीची गरज असल्याने त्या व्यक्तीने पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने एनईएफटी करून त्याला ती रक्कम संबंधित बँक खात्यात पाठविल्याचे सांगितले होतं. आता याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
