‘या’ सेलिब्रिटींनी केले लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर कोट्यवधी खर्च, एका पत्रिकेची किंमत तब्बल इतके लाख, ऐश्वर्या रायपासून ते दीपिकापर्यंत..

बाॅलिवूडच्या कलाकारांचे लग्न म्हटले की, तूफान चर्चेत असतात. कलाकार लग्नामध्ये कोट्यवधी रूपये खर्च करतात. हेच नाही तर प्रत्येक छोटया छोट्या गोष्टींवर लक्ष्य दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानला लग्न करण्याचे क्रेझ बाॅलिवूड कलाकारांमध्ये वाढले आहे. परिणीती चोप्रा हिनेही राजस्थानलाच लग्न केले.

'या' सेलिब्रिटींनी केले लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेवर कोट्यवधी खर्च, एका पत्रिकेची किंमत तब्बल इतके लाख, ऐश्वर्या रायपासून ते दीपिकापर्यंत..
celebrity
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 12:39 PM

लग्न म्हटले की, जोरदार खर्च आलाच. त्यामध्येही बाॅलिवूड कलाकारांचे लग्न म्हटले की, कोट्यवधी रूपये खर्च होतात. असे काही बाॅलिवूड स्टार आहेत, ज्यांनी लग्नाच्या पत्रिकेसाठी कोट्यवधी खर्च केले. विशेष म्हणजे अंबानी कुटुंबाच्या लग्नाच्या पत्रिकेची किंमत ऐकली तर तुम्हाला मोठा धक्काच बसेल. चला तर मग जाणून घेऊया की, सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नपत्रिकेसाठी किती पैसे खर्च केले. विशेष म्हणजे यामध्ये रणवीर सिंह ते शाहिद कपूरपर्यंतच्या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. फक्त लग्नपत्रिकेसाठी यांनी कोट्यवधी रूपये खर्च केले.

मुकेश अंबानी यांची लाडकी लेक ईशा अंबानीचे लग्न आनंद पीरामल याच्यासोबत झाले. आनंद हा प्रसिद्ध उद्योगपती आहे. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, ईशा आणि आनंदच्या लग्नात 700 कोटी खर्च लग्नाच्या पत्रिकेंसाठी करण्यात आला. त्यांच्या लग्नाच्या एका पत्रिकेची किंमत ही तब्बल 3 लाख रुपये होती. हा विवाहसोहळा देखील अत्यंत शाही पद्धतीने पार पडला.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बचचन यांचे लग्न 2007 मध्ये पार पडले. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अमिताभ बच्चन यांनी लेकाच्या लग्नात कोट्यवधी रूपये खर्च केले. रिपोर्टनुसार ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या पत्रिकेसाठी तब्बल 41 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अत्यंत खास अशी लग्नपत्रिका तयार करण्यात आली होती.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे लग्न देखील अत्यंत खास पद्धतीने पार पडले. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाला तब्बल 95 कोटी रुपये खर्च आला. यामध्ये त्यांनी लग्नाच्या पत्रिकेंवर कोट्यवधी रूपये खर्च केल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. दीपिका पादुकोण हिचे मंगळसूत्र हे 20 कोटींचे होते. हे मंगळसूत्र हिऱ्यांपासून तयार करण्यात आले.

सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केले. रिपोर्टनुसार यांच्या लग्नाच्या पत्रिकेवर तब्बल 27 कोटी रुपये खर्च करण्यात आले. लग्नपत्रिकेसोबत यांनी इतरही काही भेटवस्तू पाहुण्यांना पाठवल्या होत्या. ही अत्यंत खास अशी लग्न पत्रिका होती. बरीच दिवस या लग्नपत्रिकेची चर्चा देखील रंगली होती.

अभिनेता शाहिद कपूर याने मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न केले. यांच्या लग्नामध्येही कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नपत्रिकेसाठी 37 कोटी रुपये खर्च करण्यात आले. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाहसोहळा अत्यंत खास पद्धतीने पार पडला. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Non Stop LIVE Update
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.