
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडचे चित्रपट हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसत आहेत. सतत नेपोटिझमचा (घराणेशाही) चा आरोप हा बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांवर केला जात आहे. यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर बाॅलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केलीये. फक्त कलाकारांच्या मुलांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाच चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली जात असल्याचा आरोप काही वर्षांपासून केला जात आहे. स्टार किड्सला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करण्याचे काम करण जोहर करत असल्याने तो अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतो.
2023 हे वर्षे बाॅलिवूड कलाकारांसाठी अत्यंत खास आणि मोठे आहे. कारण यंदाच्याच वर्षी तब्बल सात स्टार किड्स हे बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जाणार आहेत. एकाच वर्षी सात स्टार किड्स लाॅन्च केले जात असल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कोणाचा मुलगा तर कोणाची मुलगी आणि मोठ्या स्टारचा नातू बाॅलिवूड चित्रपटामध्ये पर्दापण करताना दिसणार आहेत.
शाहरूख खान याची लेक सुहाना खान ही यंदाच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. जोया अख्तरच्या आर्चीज चित्रपटातून सुहाना खान ही बाॅलिवूड चित्रपटामध्ये धमाका करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुहाना खान ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसत आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटातून अजून दोन स्टार किड्स हे बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले जाणार आहेत.
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा देखील यंदा बाॅलिवूड चित्रपटामध्ये आपला जलवा दाखवताना दिसणार आहे. श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा आहे. बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर ही देखील याच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. जान्हवी कपूरनंतर खुशी कपूर ही देखील चित्रपटांमध्ये धमाका करण्यास तयार आहे.
पश्मीना रोशन ही ऋतिक रोशन याची चुलत बहीण असून ही देखील यंदा बाॅलिवूड चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. शाहरूख खान याचा मुलगा हा देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. मात्र, आर्यन खान हा अभिनेता म्हणून नाही तर डायरेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करताना दिसणार आहे.
इब्राहिम अली खान हा सैफ अली खानचा मुलगा देखील बाॅलिवूड चित्रपटामध्ये आपला जलवा करण्यास तयार आहे. अलीजा अग्निहोत्री ही सलमान खान याच्या बहिणीचे मुलगी असून ही देखील बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. काही दिवसांपूर्वीच स्टार किड्स पलक तिवारी हिने देखील सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.