AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल

हिंदी चित्रपटसृष्टीतील जॉनी वॉकर आणि मोहम्मद रफी ही अजरामर जोडी प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. रफींच्या आवाजात जॉनी वॉकर यांनी अनेक गाणी गाजवली, विशेष म्हणजे पडद्यावर दारुड्याची भूमिका साकारणाऱ्या जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधीही दारूला स्पर्श केला नाही. त्यांची कारकीर्द आणि या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल
69 वर्षांपूर्वीच गाणं आजही चिरतरूण
| Updated on: Jul 17, 2026 | 1:16 PM
Share

हिंदी चित्रपसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक कलाकारांच्या जोडीने इतिहास रचला. पण एक जोडी अशी होती, जिने प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकर आणि विख्यात गायक मोहम्मद रफी. खरंतर मोहम्मद रफी यांनी अनेक गाणी गायली. पण ते या अशा अभिनेत्याचा आवाज बनले ज्याचं नावं दारूच्या ब्रँडवरून ठेवलं होतं. मजेची गोष्ट म्हणजे त्या अभिनेत्याने आयुष्यात एकदाही दारूला स्पर्शे केला नाही. इतकंच नव्हे, तर त्यांच्यावर शूट झालेलं एक सुंदर, अवीट गोडीचं गाणं आजही डोकेदुखीवर विनोदाने ‘उपाय’ म्हणून गुणगुणलं जातं आणि ‘चंपी साँग’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. आमपण बोलतोय, मोम्मद रफी यांच्या तब्बल 69 वर्षांपूर्वीच्या त्या गाण्याबद्दल, ज्याचा वापर जाहिरातींपासून ते चंपी करतानाही मोठ्या प्रमाणावर केला गेला. हे गाणं जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.

कसं मिळालं जॉनी वॉकर नाव ?

बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण जॉनी वॉकर यांचं खरं नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काझी होतं. इंदूरमध्ये जन्मलेल्या जॉनी वॉकर यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मुंबईच्या BEST बस सेवेत कंडक्टर म्हणून नोकरी केली. प्रवाशांची हुबेहूब नक्कल करणं आणि विनोद सांगून त्यांचं मनोरंजन करणं हा त्यांचा खास अंदाज होता.

याच कलागुणांमुळे अभिनेते बलराज साहनी प्रभावित झाले आणि त्यांनी जॉनी वॉकर यांची भेट दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याशी घडवून आणली. स्क्रीन टेस्टमध्ये त्यांनी दारुड्याची भूमिका इतक्या सहजतेने साकारली की गुरुदत्त यांनी त्यांना प्रसिद्ध व्हिस्की ब्रँडवरून ‘जॉनी वॉकर’ हे नाव दिलं. मात्र पडद्यावर दारुड्याची भूमिका गाजवणाऱ्या या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात कधीही दारूचा थेंबही स्पर्श केला नाही.

300 चित्रपट आणि चार दशकांची दमदार कारकीर्द

जॉनी वॉकर यांनी जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत सुमारे 300 चित्रपटांमध्ये काम केलं. दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर आणि गुरुदत्त यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. त्या काळात फार कमी विनोदी कलाकारांना स्वतःसाठी स्वतंत्र गाणी मिळायची, पण जॉनी वॉकर यांच्यासाठी खास गाणी लिहिली जात असत.

जॉनी वॉकरचा आवाज म्हणजे मोहम्मद रफी

मोहम्मद रफी यांनी जॉनी वॉकर यांच्यासाठी तब्बल 150 हून अधिक गाणी गायल्याचं सांगितलं जातं. रफी प्रत्येक रेकॉर्डिंगपूर्वी जॉनी वॉकर यांच्या बोलण्याची शैली, हावभाव आणि अभिनयाचा अभ्यास करत असत. त्यामुळे पडद्यावर गाणं सुरू झालं की, जणू जॉनी वॉकर स्वतःच गात आहेत, असा भास व्हायचा. ‘सर जो तेरा चकराए’, ‘ये है बॉम्बे मेरी जान’ आणि ‘जाने कहाँ मेरा जिगर गया जी’ ही गाणी आजही या अजरामर जोडीची ओळख मानली जातात.

‘सर जो तेरा चकराए’ आजही तितकंच लोकप्रिय

1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या अजरामर अशा ‘प्यासा’ या चित्रपटातील ‘सर जो तेरा चकराए’ हे गाणं काळाच्या कसोटीवर आजही टिकून राहिलं आहे. गुरुदत्त, माला सिन्हा आणि वहीदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला संगीतकार एस. डी. बर्मन यांनी संगीत दिलं होतं. मात्र हे चंपी साँग जॉनी वॉकर यांच्यावर चित्र करण्यात आलं होतं. आजही कुणी तेलमालिश किंवा डोक्याची चंपी करत असेल, तर हे गाणं नकळतओठांवर येतं आणि गुणगुणायला लागतात. इतक्या दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे, आणि म्हणूनच ते भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात आयकॉनिक ‘चंपी साँग’ म्हणून ओळखलं जातं.

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष