वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाला अभिनेता म्हणाला ‘वाहियात’; रणवीर सिंगवरही साधला निशाणा

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Nov 27, 2022 | 12:42 PM

वरुणच्या 'भेडिया'ला का म्हणाला 'वाहियात'? प्रेक्षकांच्या निवडीवरही उपस्थित केला प्रश्न

वरुण धवनच्या 'भेडिया' चित्रपटाला अभिनेता म्हणाला 'वाहियात'; रणवीर सिंगवरही साधला निशाणा
Bhediya
Image Credit source: Twitter

मुंबई: अभिनेता वरुण धवनचा ‘भेडिया’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र या चित्रपटावरही टीका करण्याची संधी स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने सोडली नाही. बॉलिवूड कलाकार आणि चित्रपटांवर सतत निशाणा साधल्यामुळे केआरके नेहमीच चर्चेत असतो. इंडस्ट्रीतील घराणेशाहीवरही त्याने वेळोवेळी संताप व्यक्त केला आहे. आता दिग्दर्शक डेव्हिड धवनचा मुलगा वरुण याच्या ‘भेडिया’ या चित्रपटावरून केआरकेनं केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे.

‘भेडिया हा चित्रपट फ्लॉप झाला आहे. मात्र हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की असा ‘वाहियात’ आणि ते सुद्धा वरुण धवनचा चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये कसे जात आहेत? म्हणजे लोक चांगल्या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी तयार आहेत. याचा अर्थ ‘सर्कस’ हा चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर होऊ शकतो’, असं ट्विट केआरकेनं केलं आहे.

वरुण धवनच्या ‘भेडिया’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीम्या गतीने सुरुवात केली. शुक्रवारी या चित्रपटाने 7.48 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र शनिवारी कमाईत चांगली वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

सर्कस हा अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाची कलाविश्वात जोरदार चर्चा आहे. यामध्ये रणवीरसोबत जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, जॉनी लिव्हर आणि वरुण शर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI