AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वर्षांपासून हिटची प्रतीक्षा ! या अभिनेत्याच्या नव्या सिनेमावर लागले 150 कोटी, पहिल्या दिवशी किती कमावणार ?

आज आपण बॉलिवूडच्या ज्या कलाकाराबद्दल बोलतोय, तो 2016 पासून एक हिटसाठी तरसतोय. मध्यंतरी आलेला त्याचा एक सिनेमा चांगला चालला खरा, पण तो ओटीटीवर रिलीज झाला होता.

10 वर्षांपासून हिटची प्रतीक्षा ! या अभिनेत्याच्या नव्या सिनेमावर लागले 150 कोटी, पहिल्या दिवशी किती कमावणार ?
Image Credit source: social media
| Updated on: Sep 24, 2026 | 3:09 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते असे आहेत ज्यांच्याकडे चांगला चेहरा, स्क्रीन प्रेझेन्स आहे,अभियनही बऱ्यापैकी करतात. पण बऱ्याच काळापासून त्यांचा एकही चित्रपट हिट झालेला नाही. आजा आपण ज्या अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत त्याचंही असंच काहीसं झालं. बॉलिवूडचा हँडसम हंक अशी ओळख असलेला, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘द वन’ हा चित्रपट उद्या ( 25 सप्टेंबर) थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तमन्ना भाटिया देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून विशेष अपेक्षा असून चित्रपटाची ते उत्सुकतेने वाट बघत आहेत. मात्र त्याचसोबत हा चित्रपट चांगला चालावा, चित्रपुटाने चांगली कमाई करावी अशीही अनेकांना अपेक्षा आहे. याचं कारण म्हणजे गेल्या 10 वर्षांत सिद्धार्थ मल्होत्राने एकही हिट चित्रपट दिलेला नाही. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर तो फ्लॉप, डिझास्टर आणि ॲव्हरेज ( चित्रपट) यापेढ मजल मारू शकलेला नाही.

दशकभरापासून हिटची पाहतोय वाट

2016 सालापासून सिद्धार्थच्या अयशस्वी चित्रपटांची यादी सुरू होते. ‘बार बार देखो’ हा त्याचा पहिला असा चित्रपट होता, जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘ अ जेंटलमन’ डिजास्टर ठरला, ‘अय्यारी’नेही निराशा केली, तसेट ‘जबरिया जोड़ी’ फ्लॉप, ‘मरजावां’ हा चित्रपट सरासरी ठरला. त्याच्या बहुचर्चित ‘शेरशाह’ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्याच्या कामाचंही खूप कौतुक झालं. मात्र हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नव्हे तर ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

त्यानंतर सिद्धार्थचा आणखी एक चित्रपट आला ‘थँक गॉड’, मात्र तोही फ्लॉप ठरला. नंतर आलेला ‘मिशन मजनू’ ओटीटीवर प्रदर्शित झाला. ‘योद्धा’ चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला, आणि ‘इंडियन पुलिस फोर्स’ ही फिल्मही ओटीटीवर रिलीज झाली. त्यानंतर त्याचा आणखी एक चित्रपट म्हणजे ‘परम सुंदरी’, पण तोही फ्लॉप ठरला.

आता ही एवढी मोठी यादी वाचता-वाचता तुम्हालाही काळजी वाटली असेल तर मग चित्रपट निर्माते किती चिंतातूर झाले असतील विचार करा. ! किंवा कदाचित ते टेन्शन फ्री असतील, म्हणूनच एकापाठोपाठ एक निर्माते हे सिद्धार्थ मल्होत्रावर पैसे लावत आहेत. असं म्हणतात की उम्मीद पे दुनिया कायम है ! त्यामुळे यावेळी तरी सिद्धार्थ त्याच्या हिटच्या दुष्काळावर मात करण्यात यशस्वी होईल आणि त्याच्या आगामी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळेल अशी चाहत्यांना आशा आहे.

द वन चित्रपटाचं बजेट

सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर त्याचं बजेट 150 कोटी रुपये आहे. या चित्रपटासाठी सिद्धार्थला 12 कोटी, तमन्नाला 5 कोटी रुपये फी मिळाली. तसेच सुनील ग्रोव्हरला 2 कोटी, मनीष पॉल याला 90 लाख, अभिनेत्री श्वेता तिवारी हिला 70 लाख तर अनुप सोनीला 60 लाख रुपयांत साईन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ॲडव्हान्स बुकिंगबद्दल सांगायचं झालं तर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी सिद्धार्थ मल्होत्राचा द वन चित्रपट हा सुमारे 5.29 कोटी रुपये कमवू शकतो. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो आणि तो हिट ठरतो का फ्लॉप, हे तर येणारा काळच सांगेल.

Follow Us
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती