AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 व्या वर्षी हिट गाणं, सलमानसोबत सुपरहिट फिल्म; लग्नानंतर इंडस्ट्री सोडून आता ही अभिनेत्री..

गोड चेहरा आणि मोहक हास्याच्या या अभिनेत्रीने लहान वयातच टीनएजर मॉडेल म्हणून काम करण्यास सुरूवात केली. हळूहळू तिला एवढी प्रसिद्धी मिळाली की अवघ्या 15 व्या वर्षी ती फाल्गुनी पाठकच्या हिट गाण्यात झळकली.

15 व्या वर्षी हिट गाणं, सलमानसोबत सुपरहिट फिल्म; लग्नानंतर इंडस्ट्री सोडून आता ही अभिनेत्री..
| Updated on: Oct 08, 2026 | 5:05 PM
Share

फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणं हे काही खायचं काम नाही. ही एक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून अनेक कलाकार वर्षानुवर्षे अथक मेहनत करतात. तर काही कलाकार असेही असतात की ज्यांना लोकप्रियता, प्रसिद्धी तर मिळते पण ती जास्त काळ टिकत नाही. एक अशीच अभिनेत्री म्हणजे आयेशा टाकिया.. अवघ्या 15 व्या वर्षीच आयेशाला फाल्गुनी पाठक हिच्या ‘मेरी चुनर उड़ उड़ जाए’ या म्युझिक व्हिडीओत काम मिळालं. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही, फिल्म इंडस्ट्रीत आल्यावर तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. दबंग स्टार सलमान खानसोबतही तिने चित्रपट केला. ती फिल्म सुपरहिट ठरली. आएशाने फिल्म इंडस्ट्रीतील एकाहून एक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं, पण ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये ती फार काळ टिकली नाही. सुरूवातीला आएशाला फार मेहनत करावी लागली नाही. कधील क्युट स्माइल तर कधी सौंदर्यामपळे ती नवनव्या प्रोजेक्ट्समध्ये झळकत होती. मात्र हाच प्रवास सुरू ठेवण्याऐवजी तिने लग्न करून संसार करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्राला अलविदा केलं,

हिट म्युझिक व्हिडिओनंतर आएशा टाकियाने ‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘सोचा ना था’, ‘डोर’, ‘वाँटेड’ सारख्या चित्रपटांत दिसली. या चित्रपटांमुळे तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटांमुळे तिला इतकं यश मिळालं तिचं नाव टॉप अभिनेत्रींमध्ये समाविष्ट झालं. साधारणपणे असं होतं की चित्रपट फ्लॉप झाले की, लोक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतात, पण आएशा हिने ज्यावेळेस इंडस्ट्रीला निरोप दिला, ती करिअरच्या पीकवर होती, हिट अभिनेत्री होती.

अनेक चित्रपटांत झळकली

आएशा टाकियाने चित्रपट प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वीच ग्लॅमर इंडस्ट्रीत पदार्पण केलं होते. प्रत्यक्षात तिने लहान वयातच टीनएजर मॉडेल म्हणून काम सुरू केले होते. अभिनेता शाहिद कपूरसह ती ‘कॉम्प्लॅन’ च्या लोकप्रिय टीव्ही कमर्शियलमध्ये दिसली होती. त्यानंतर 15 वर्षांच्या वयात तिला फाल्गुणी पाठकच्या म्युझिक व्हिडिओ ‘मेरी चुनर उड़ उड़ जाए’ मध्ये काम मिळालं. या गाण्यातील आएशाचा अंदाज, तिचा लूक, अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. त्यानंतर 2004 साली तिने ‘टारझन द वंडर कार’ ने डेब्यू केला. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेयरचा बेस्ट फीमेल डेब्यू अॅवॉर्ड मिळाला होता.

त्यानंतर 2009 साली सलमानसोबत आलेला वाँटेड हा आएशाच्या हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी तिने 1 मार्च रोजी रेस्टॉरंट व्यापारी फरहान आजमीसोबत लग्न केले. तेव्हा ती फक्त 22 वर्षांची होती. लग्नानंतर मात्र ती चित्रपटांपासून ती दूर राहिली आणि आएशा तिचा पती फरहान याच्या रेस्टॉरंट व्यवसायात सहभागी झाली. लग्नानंतर 2011 मध्ये तिने नागेश कुकुनूरच्या चित्रपटात काम केलं. पण हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. आता सध्या पतीसोबतच त्याच्या व्यवसायाला हातभार लावते.

Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र