Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 अफेअर, 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न, पण नाही टिकलं लग्न, 2 मुलांसोबत अभिनेत्री जगतेय आयुष्य

12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत 'या' अभिनेत्रीने थाटला संसार, पण नाही टिकलं नातं, 2 मुलांच्या जन्मानंतर त्याने सोडली साथ, आता 2 मुलांसोबत अभिनेत्री जगतेय आयुष्य, नाही केला दुसऱ्या लग्नाचा विचार... एक काळ तिचा बॉलिवूडमध्ये होता बोलबाला...

3 अफेअर, 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न, पण नाही टिकलं लग्न, 2 मुलांसोबत अभिनेत्री जगतेय आयुष्य
Follow us
| Updated on: Feb 09, 2025 | 3:26 PM

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी मोठ्या आनंदाने लग्न केलं. पण लग्नाच्या काही वर्षानंतर अभिनेत्रींच्या आयुष्यात कायमचा एकटेपणा आला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री अमृता सिंग… अमृता हिचा जन्म पाकिस्तान येथे 1958 साली झाला. अमृताने बॉलिवूडला अनेक हीट सिनेमे दिले. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ सिनेमातून अमृता हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अमृता हिचा पहिलाच सिनेमा सुपरहीट ठरला आणि अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली. त्यानंतर अमृताला अनेक सिनेमांसाठी ऑफर आल्या. अभिनेत्रीने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. अमृता प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचली. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला.

पहिल्या सिनेमात काम करत असताना अमृता आणि सनी देओल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. पण जेव्हा अभिनेत्रीला कळलं की सनीचं लग्न झालं आहे. अभिनेत्रीने सनी याच्यासोबत असलेलं नातं संपवलं… सनी देओल याच्यानंतर अमृताचं नाव क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

हे सुद्धा वाचा

सनी देओल आणि रवी शास्त्री यांच्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेता विनोद खन्ना याच्यासोबत देखीत चर्चेत आलं. त्यानंतर अमृताच्या आयुष्यात अभिनेता सैफ अली खान याची एन्ट्री झाली. पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री त्यानंतर प्रेम बहरलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

1991 मध्ये अमृता सिंह आणि सैफ अली खान यांनी कुटुंबियांना न सांगता गुपचूप लग्न केलं. लग्नावेळी अमृता सिंह 32 वर्षांची तर सैफ अली खानचं वय केवळ 20 वर्ष होतं. लग्नानंतर अमृता हिने मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खान यांना जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर 13 वर्षांनी सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर एकट्या अमृताने सैफ आणि इब्राहिम यांचा सांभाळ केला. तर सैफ याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत दुसरा संसार थाटला. पण अमृता हिने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.. आजही अभिनेत्री मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.