
Bollywood Actress Life: बॉलिवूड अभिनेत्री कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्रींना नकोत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. कास्टिंग काऊच, चांगल्या भूमिकेसाठी करावी लागणारी तडजोड… अशा भयानक गोष्टींचा अभिनेत्रींना सामना करावा लागतो. असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. जिने करीयरच्या सुरुवातीला वेगवेगळ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत. याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत देखील केला आहे.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शर्लिन चोप्रा आहे. शर्लिन चोप्रा हिला कायम तोकड्या कपड्यांमध्ये स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर देखील शर्लिन कायम सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओमुळे शर्लिन हिला अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो.
एवढंच नाही तर, परखड वक्तव्यामुळे देखील शर्लिन चोप्रा चर्चेत असते. दरम्यान, करीयरच्या सुरुवातीचे कठीण दिवस आठवत शर्लिन हिने धक्कादायक खुलासा केला. रिपोर्टनुसार, करीयरच्या सुरुवातील शर्लिन हिने अनेक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवले.
फक्त पैशांसाठी अनेक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवलं… असा खुलासा शर्लिन हिने केली होता. एवढंच नाही तर, शर्लिन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली होती. पोस्ट शर्लिनने लिहिल्याप्रमाणे, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अनेकांनी मला फोन देखील केले. कारण, मी हे काम फक्त आणि फक्त पैशांसाठी करत होती. मी याठिकाणी सर्वकाही सांगत आहे कारण लोकांना मी बिचारी वाटत आहे किंवा त्यांनी माझ्याकडे एक वाईट मुलगी या नजरेनं पाहावं…
मी सत्य सांगत आहे कारण आजही मला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी फोन आणि मेसेज येतात. त्यांनी आता समजून घेतलं पाहिजे की मी असं काम पूर्वी करायची. पूर्वी केलेलं काम आता माझ्या लक्षात नाही… असं देखील शर्लिन चोप्रा म्हणाली होती.
शर्लिन चोप्रा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने कामसूत्र 3डी, खेल, चमेली, पौरुषपूर यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण शर्लिन हिला प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. आता शर्लिन अभिनयापासून दूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शर्लिन कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.