AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्या याच्या घटस्फोट घेतल्यानंतर असे जगत आहे नताशा आयुष्य, माहेरी जाऊन…

हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्या याच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. नताशा हिच्यासोबत हार्दिक पांड्या याने घटस्फोट घेतलाय. चार वर्षांनंतर यांचे नाते तुटले आहे. घटस्फोटानंतर नताशा मायदेशी परतलीये.

हार्दिक पांड्या याच्या घटस्फोट घेतल्यानंतर असे जगत आहे नताशा आयुष्य, माहेरी जाऊन...
Hardik Pandya and Natasha Stankovic
| Updated on: Jul 24, 2024 | 12:32 PM
Share

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सतत सांगितले जात होते. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर बोलणे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी काही महिने टाळले. भारती संघाने T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरही एक पोस्ट देखील नताशा स्टॅनकोविक हिने सोशल मीडियावर शेअर केली नाही. भारत सोडून सर्बियाला नताशा स्टॅनकोविक ही आपल्या मुलासोबत गेलीये. त्यानंतर नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.

हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना नताशा ही दिसत आहे. नताशा हिने इंस्टाग्राम स्टोरीवर मुलगा अगस्त्य याच्यासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. मुलासोबत मस्ती करताना नताशा दिसत आहे.

पार्कमधील काही खास फोटो नताशा हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घटस्फोटामधून बाहेर पडण्यासाठी मुलासोबत जास्त वेळ घालवताना नताशा दिसत आहे. हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही भारतात येणार की नाही? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. काही रिपोर्टनुसार सध्याच नताशा भारतामध्ये येणार नाहीये.

Hardik Pandya and Natasha Stankovic

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा यांनी कोर्ट मॅरेज केले होते. गेल्याच वर्षी अत्यंत शाही पद्धतीने यांचा विवाहसोहळा परत एकदा राजस्थानमध्ये पार पडला. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी घटस्फोटाच्या पोस्टमध्येच स्पष्ट केले होते की, मुलाचा सांभाळ दोघे मिळून करणार आहेत. हार्दिक पांड्या याच्या प्रत्येक सामन्यात त्याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमध्ये नताशा ही पोहोचत. काही वर्षे एकमेकांना डेट करून हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?