तब्बल 550 वेळा थिएटरमध्ये री-रिलीज झाला हा चित्रपट, ‘शोले’सह अनेकांचे मोडले रेकॉर्ड, आजही पाहण्यासाठी होते गर्दी

'शोले'सह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड मोडणारा एकमेव चित्रपट. जो एक-दोनदा नाही तर तब्बल 550 वेळा थिएटरमध्ये करण्यात आला रि-रिलीज. आजही प्रेक्षक पाहण्यासाठी करतात गर्दी.

तब्बल 550 वेळा थिएटरमध्ये री-रिलीज झाला हा चित्रपट, शोलेसह अनेकांचे मोडले रेकॉर्ड, आजही पाहण्यासाठी होते गर्दी
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 14, 2026 | 3:00 PM

गेल्या काही वर्षांत जुन्या चित्रपटांना पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. 2023 पासून अनेक लोकप्रिय चित्रपटांचे री-रिलीज होत आहेत. साधारणपणे एखादा चित्रपट दोन-तीन वेळा किंवा जास्तीत जास्त दहा-बारा वेळा पुन्हा प्रदर्शित केला जातो. उदाहरणार्थ Sholay आणि Mughal-e-Azam यांसारखे चित्रपट वर्षानुवर्षे अनेकदा थिएटरमध्ये दाखवले गेले आहेत.

मात्र कन्नड चित्रपटसृष्टीतील एका चित्रपटाने या बाबतीत जबरदस्त विक्रम केला आहे. हा चित्रपट म्हणजे ‘ओम’. या चित्रपटाने तब्बल 550 वेळा थिएटरमध्ये री-रिलीज होण्याचा विक्रम केला आहे.

30 वर्षांत 550 वेळा री-रिलीज

ओम हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक उपेंद्र यांनी केले होते. चित्रपटात मुख्य भूमिकेत शिवा राजकुमार आणि प्रेमा होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला.

Limca Book of Records च्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांत या चित्रपटाचे तब्बल 550 वेळा री-रिलीज झाले आहेत. विशेष म्हणजे काही थिएटरमध्ये हा चित्रपट 30 वेळांपेक्षा जास्त वेळा पुन्हा दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटाची कथा आणि त्यातील वास्तववादी गँगस्टर शैलीमुळे प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे चाहत्यांच्या मागणीमुळे हा चित्रपट वारंवार थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला.

कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रभावी चित्रपट

ओम हा केवळ सर्वाधिक वेळा री-रिलीज झालेला चित्रपट नाही तर कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावी गँगस्टर चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटामुळे शिवा राजकुमार यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आणि ते 1990 च्या दशकातील कन्नड चित्रपटसृष्टीतील मोठे स्टार बनले.

या चित्रपटाची लोकप्रियता इतकी वाढली की त्याचे अधिकृत आणि अनधिकृत असे अनेक भाषांमध्ये रिमेक करण्यात आले. हिंदीमध्ये अर्जुन पंडित, तेलुगूमध्ये ओमकारण आणि बंगालीमध्ये पंजा या नावांनी त्यावर आधारित चित्रपट तयार करण्यात आले.

Follow Us