AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sidharth-Kiara | ‘या’ सुपरस्टारच्या बॉडीगार्डने उचलली सिद्धार्थ-कियाराच्या सुरक्षेची जबाबदारी

4 फेब्रुवारीपासून पाहुणे जैसलमेरला पोहोचण्यास सुरूवात होईल आणि 5 फेब्रुवारीपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. एकीकडे लग्नासाठीची सर्व तयारी होत आली आहे आणि दुसरीकडे सिद्धार्थ-कियाराच्या सुरक्षेची जबाबदारी एका खास व्यक्तीकडे सोपवण्यात आल्याचं कळतंय.

Sidharth-Kiara | 'या' सुपरस्टारच्या बॉडीगार्डने उचलली सिद्धार्थ-कियाराच्या सुरक्षेची जबाबदारी
Kiara and SidharthImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2023 | 1:34 PM
Share

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित असतील. या लग्नाच्या सर्व तयारीची जबाबदारी मुंबईतल्या एका मोठ्या वेडिंग प्लॅनर कंपनीला सोपवण्यात आली आहे. या कंपनीने सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली आहे. तर 4 फेब्रुवारीपासून पाहुणे जैसलमेरला पोहोचण्यास सुरूवात होईल आणि 5 फेब्रुवारीपासून लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. एकीकडे लग्नासाठीची सर्व तयारी होत आली आहे आणि दुसरीकडे सिद्धार्थ-कियाराच्या सुरक्षेची जबाबदारी एका खास व्यक्तीकडे सोपवण्यात आल्याचं कळतंय.

नव्या रिपोर्ट्सनुसार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाच्या सुरक्षेची जबाबदारी ही शाहरुख खानच्या एक्स-बॉडीगार्डकडे सोपवण्यात आली आहे. 3 फेब्रुवारी रोजी बॉडीगार्ड्स आणि सिक्युरिटी गार्ड्सची टीम रवाना होणार आहे.

एकेकाळी शाहरुखच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणारा बॉडीगार्ड यासीन युगल आता सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या सुरक्षेवर आपली कडी नजर ठेवणार आहे. यासीन बऱ्याच वर्षांपर्यंत शाहरुखचा बॉडीगार्ड होता. या लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी सहभाग होणार आहेत. यामध्ये करण जोहर, ईशा अंबानी, शाहिद कपूर, मनिष मल्होत्रा यांसारखी नावं चर्चेत आहेत.

सिद्धार्थ-कियाराच्या या लग्नाला 100 ते 125 पाहुणे उपस्थित असणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी 84 रुम्स बुक करण्यात आले आहेत. या एका रुमचं भाडं जवळपास दीड लाख रुपये असल्याचं कळतंय. लग्नाला हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी 70 आलिशान गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...