‘स्टाइल’ फेम अभिनेत्यासोबत टायगर श्रॉफ याची आई रिलेशनशिपमध्ये? नक्की काय आहे सत्य

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

|

Updated on: Jan 11, 2023 | 12:19 PM

'स्टाइल' फेम अभिनेत्याचे टायगर श्रॉफ याच्या आईवर गंभीर आरोप; अभिनेत्याच्या आईने सत्य सांगितल्यानंतर सर्वत्र खळबळ

'स्टाइल' फेम अभिनेत्यासोबत टायगर श्रॉफ याची आई रिलेशनशिपमध्ये? नक्की काय आहे सत्य
'स्टाइल' फेम अभिनेत्यासोबत टायगर श्रॉफ याची आई रिलेशनशिपमध्ये? नक्की काय आहे सत्य

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याची (Tiger shroff) आई काही वर्षांपूर्वी ‘स्टाइल’ फेम अभिनेता साहिल खान (sahil khan) याने केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नी आयशा श्रॉफ (ayesha shroff) यांच्यासोबत ‘स्टाइल’ फेम अभिनेता साहिल खानने रोमांटिक अफेयरमध्ये असण्याचा दावा केला होता. साहिल आयशा यांच्यासोबत नात्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. साहिलने केलेल्या गंभीर आरोपांना आयशा यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं. ज्यामुळे साहिल वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

आयशा म्हणाल्या, साहिल आणि पत्नी निगार खान यांचा घटस्फोट झाला. कारण साहिलने तो गे असल्याची गोष्ट पत्नीपासून लपवली होतीन. तर साहिलच्या पत्नीने त्याला एका पुरुषासोबत आपत्तीजनक अवस्थेत देखील पाहिलं होतं. शिवाय आयशा आणि साहिल यांच्यातील वाद इतके वाढले की, ते थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले.

साहिल अनोळख्या मोबाईल नंबरवरून सतत फोन करत धमकावत असल्याचा आरोप आयशा यांनी केला. आयशा आणि साहीलने २००९ साली पार्टनरशिपमध्ये एक व्यवसाय सुरु केला होता. कंपनी सुरु झाल्यानंतर साहिल सतत पैसे मागत असल्याचा आरोप देखील आयशा यांनी साहिलवर केला होता. (sahil khan and ayesha shroff controversy)

एवढंच नाही, तर आयशा यांनी तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप देखील साहिलवर केला. पण साहिलने आयशा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले होते. साहिल सर्व आरोप फेटाळत म्हणाला, ‘आयशा आणि रिलेशनशिपमध्ये होतो आणि विभक्त झाल्यानंतर महागड्या भेटवस्तू आणि सुट्ट्यांसाठी खर्च झालेल्या पैश्यांचा हिशेब मागत होती. ‘

पण जेव्हा आयशा आणि साहिल यांचं प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं तेव्हा २०१५ साली दाखल करण्यात आलेली फसवणूक आणि धमकीची तक्रार २०२१ मध्ये कोर्टाने रद्द केली. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर साहिलवर एक लाख रुपयांचं दंड ठोठावण्यात आलं आणि ही रक्कम महाराष्ट्र बाल कल्याण समितीला देण्याच आली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI