Sonali Phogat: टिक-टॉक स्टार ते राजकारण.. सोनाली फोगाट यांचा जीवनप्रवास

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 23, 2022 | 10:55 AM

सोनाली यांनी 'अम्मा' या टीव्ही मालिकेत नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय त्या 'बंदुक आली जाटणी' या हरियाणवी गाण्यातही दिसल्या आहेत. त्यांनी 'द स्टोरी ऑफ बदमाजगढ' या वेब सीरिजमध्येही काम केलं होतं.

Sonali Phogat: टिक-टॉक स्टार ते राजकारण.. सोनाली फोगाट यांचा जीवनप्रवास
Sonali Phogat: टिक-टॉक स्टार ते राजकारण.. सोनाली फोगाट यांचा जीवनप्रवास
Image Credit source: Instagram

भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. त्या 41 वर्षांच्या होत्या. टिक-टॉक स्टार (Tik Tok Star) म्हणून त्यांना ओळखलं जायचं. काही स्टाफ सदस्यांसह त्या गोव्याला गेल्या होत्या. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सोनाली यांनी भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून शेवटची निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. गेल्या आठवड्यात कुलदीप बिश्नोई यांनीही त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सोनाली फोगाट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद इथं झाला. त्यांनी 2006 मध्ये हिस्सार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. सोनाली यांचं लग्न बहिणीच्या दिराशी झालं होतं. त्यांना यशोदारा फोगाट ही मुलगी आहे. 2016 मध्ये सोनाली यांचा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यावेळी सोनाली मुंबईत होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी वसतिगृहात राहते.

 

हे सुद्धा वाचा

View this post on Instagram

 

A post shared by Sonaliiphogat (@sonali_phogat_official)

सोनाली यांनी ‘अम्मा’ या टीव्ही मालिकेत नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय त्या ‘बंदुक आली जाटणी’ या हरियाणवी गाण्यातही दिसल्या आहेत. त्यांनी ‘द स्टोरी ऑफ बदमाजगढ’ या वेब सीरिजमध्येही काम केलं होतं. सोनाली या सोशल मीडियावर, विशेषतः टिकटॉकवर खूप सक्रिय होत्या. टिकटॉकवर त्यांना 1 लाख 32 हजार युजर्स फॉलो करत होते. दररोज त्या टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवून पोस्ट करायच्या. त्यांना टिक टॉक स्टार म्हणूनही ओळखलं जायचं. बिग बॉसच्या 14 व्या पर्वातही त्यांनी हजेरी लावली होती.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI