TMKOC | ‘तारक मेहता’च्या चाहत्यांना वाट बघावी लागणार? ‘दया बेन’च्या वापसीवर प्रश्न विचारताच असित मोदी म्हणाले…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 13 वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे.

TMKOC | ‘तारक मेहता’च्या चाहत्यांना वाट बघावी लागणार? ‘दया बेन’च्या वापसीवर प्रश्न विचारताच असित मोदी म्हणाले...
दिशा वाकानी

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 13 वर्षे लोकांचे मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. शोमध्ये दयाबेन परत येत असल्याच्या बातम्या सध्या खूप चर्चेत आहेत. दयाबेन यांच्या परतीच्या प्रतीक्षेत चाहते देखील उत्सुक आहेत. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी (Disha Vakani) बर्‍याच दिवसांपासून शोपासून लांब होती. सध्या ‘तारक मेहता..’ही मालिका ‘दया बेन’ या पात्राशिवाय सुरु आहेत. आता निर्मात्याने अभिनेत्रीच्या परत येण्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे, जे ऐकून तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसू शकतो (TMKOC producer Asitkumar modi reaction on Daya ben entry in show).

एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असित मोदी यांना ‘दया बेन’ यांच्या परतीबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यावर ते म्हणाले की, ‘मला वाटते की आता मीच दयाबेन झाले पाहिजे. अनेक वर्षांपासून दयाबेन यांच्या परतीबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहेत.’ असित मोदी म्हणाले की, निर्माते दिशा वाकानीच्या परत येण्याची वाट पाहत आहेत, पण जर अभिनेत्रीने शो सोडण्याची इच्छा व्यक्त केली तर शो नवीन दयाबेन सोबत पुढे जाईल. आम्ही अजूनही तिच्या परतीच्या प्रतीक्षेत आहोत.’

असित मोदी पुढे म्हणाले की, पण यावेळी मला वाटते असे की, दया बेनची वापसी आणि पोपटलाल यांचे लग्न हे फार महत्वाचे नाही. या साथीच्या आजारात आणखी बऱ्याच मोठ्या समस्या उद्भवत आहेत, ज्याकडे लक्ष देणे या वेळी फार महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, यावेळी आपल्याला सेफ्टी प्रोटोकॉल आणि शूटची विशेष काळजी घ्यावी लागेल जेणेकरून याचा परिणाम कोणाच्याही दैनंदिन जीवनात होणार नाही. तसेच, बायो बबल योग्य असल्यास, प्रभावी असल्यास आम्हाला त्या स्वरूपात काम करण्यास आवडेल (TMKOC producer Asitkumar modi reaction on Daya ben entry in show).

शोच्या शूटिंगबद्दल म्हणाले…

मुंबईत या कार्यक्रमाच्या शूटिंगवर बंदी आल्यानंतर सीरियलचे शूटिंग इतर शहरांमध्येही सुरू आहे. ‘तारक मेहता’चा सेट शिफ्ट करण्याबाबत असित मोदी म्हणाले की, आमच्याकडे एपिसोडची बँक  तयार आहे. त्यामुळे आम्हाला दुसर्‍या शहरात जाऊन शूट करण्याची गरज नाही. ते म्हणाले, आता तारक मेहताचा बेस बदलण्याची त्यांची योजना आहे आणि ते लवकरच होईल.

शोच्या सेटवर दिसली दिशा वाकानी

काही काळापूर्वी ‘तारक मेहताच्या उल्टा चष्मा’च्या सेटवर अभिनेत्री दिशा वाकानी दिसली होती. त्यानंतर चाहत्यांनी असा विचार सुरू केला की, ती लवकरच शोमध्ये परतणार आहे. पण दिशा शूटसाठी नाहीतर दुसर्‍याच कुठल्यातरी कामासाठी शोच्या सेटवर गेली होती.

(TMKOC producer Asitkumar modi reaction on Daya ben entry in show)

हेही वाचा :

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवरून सोनू सूदने चीनला सुनावले खडे बोल, चीनच्या राजदूताने दिली प्रतिक्रिया…

जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI