Trailer Out | दुर्गामती चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरच्या जबरदस्त लूकमुळे चाहते उत्सुक!

भूमी पेडणेकरच्या ‘दुर्गामती’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ती दणदणीत भूमिकेत दिसत आहे. तिच्या या चित्रपटामध्ये माही गिलही एका विशेष भूमिकेत दिसली आहे.

Trailer Out | दुर्गामती चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, भूमी पेडणेकरच्या जबरदस्त लूकमुळे चाहते उत्सुक!
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 7:59 PM

मुंबई : भूमी पेडणेकरच्या ‘दुर्गामती’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात ती दणदणीत भूमिकेत दिसत आहे. तिच्या या चित्रपटामध्ये माही गिलही एका विशेष भूमिकेत दिसत आहे. दुर्गामती चित्रपट अक्षय कुमार निर्मित आहे. पूर्वी या चित्रपटाचे नाव दुर्गावती असे होते परंतु ते बदलून दुर्गामती करण्यात आले. अक्षयला चित्रपट लक्ष्मी बॉम्बसारख्या कोणत्याही वादात पडायचे नसल्यामुळे अक्षयने अगोदरच चित्रपटाचे नाव बदलून घेतले आहे. दुर्गामती हा चित्रपट 11 डिसेंबर रोजी अॅमॅझोन प्राईमवर रिलीज होणार आहे.(Trailer of Durgamati movie released, Bhumi Pednekar’s tremendous look)

‘दुर्गामती’ हा चित्रपट एक थ्रिलर सस्पेन्स आहे, हे ट्रेलर पाहून लक्षात येते. यामध्ये सूडबुद्धीने वागणाऱ्या एका व्यक्तीची ही कहाणी आहे. भूमी एकामागून एक चांगल्या भूमिका करताना दिसत आहे. चित्रपटाचा स्टोरी निवडण्यापूर्वी ती स्क्रिप्टमध्ये तिची भूमिका किती आहे आणि चित्रपटात तिची भूमिका चांगली आहे का याची नेहमी काळजी घेताना दिसत आहे. मध्यंतरी हिंदू सेना आणि करणी सेनेच्या विरोधानंतर अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलून लक्ष्मी ठेवण्यात आले होते. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. बर्‍याच लोकांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती आणि सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी केली जात होती. करणी सेनेने अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलण्यासाठी नोटीस पाठविली होती. ही नोटीस चित्रपटाच्या निर्मात्यांना पाठविली गेली होती. चित्रपटाच्या नावावरून वाढणारा वाद पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेंस आणि चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी ठेवलेल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर सीबीएफसीशी चर्चा करून, आपल्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन, चित्रपटाचे निर्माते शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय अखेर घेतला होता. हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी डिज्नी हॉटस्टार रिलीज झाला होता. ‘हे’ होते वादाचे मुख्य कारण एका विशिष्ठ समुदायाला भडकवण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या मते, लक्ष्मी या नावासमोर बॉम्ब हा शब्द वापरणे अमान्य आहे. आपण ज्या लक्ष्मीची पूजा करतो, तिचा सन्मान करतो, तिच्या नावापुढे बॉम्ब असा शब्द लिहिणे अतिशय निंदनीय आहे. अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचे देखील हिंदू सेनेने म्हटले होते. या चित्रपटात एक हिंदू मुलगी आणि मुस्लिम तरुणाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. याच मुद्द्याला धरून, हिंदू सेनेने प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचे नाव नाव बदलण्याची मागणी केली होती.

संबंधित बातम्या :

Ram Setu | अक्षय कुमारकडून चाहत्यांना खास भेट, दिवाळीच्या मुहूर्तावर ‘राम सेतू’ची पहिली झलक प्रदर्शित!

(Trailer of Durgamati movie released, Bhumi Pednekar’s tremendous look)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.