इतिहासप्रेमी आणि साहित्यरसिकांसाठी ‘खजिना’, बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रेरणादायी आवाजात संपूर्ण ‘शिवचरित्रकथन’ स्टोरीटेलवर!

पंधरा भागांची संपूर्ण 'शिवचरित्रकथन' व्याख्यानमाला बाबासाहेबांच्या प्रेरणादायी आवाजात स्टोरीटेलवर ऐकता येणार आहे. याशिवाय त्यांनी सांगितलेल्या हिरकणी, प्रतापराव गुजर, बुलंद बुरुज अशा ऐतिहासिक सात कथाही स्टोरीटेलवर स्वतंत्रपणे ऐकायला मिळणार आहेत. ('Treasure' for history lovers and literary lovers, the entire 'Shivacharitrakathan' on storytel in the inspiring voice of Babasaheb Purandare!)

इतिहासप्रेमी आणि साहित्यरसिकांसाठी 'खजिना', बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रेरणादायी आवाजात संपूर्ण ‘शिवचरित्रकथन’ स्टोरीटेलवर!

मुंबई : बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी त्यांच्या समर्थ लेखणीतून ‘राजा शिवछत्रपती’ यांचा इतिहास विविध प्रेरणादायी ग्रंथांतून त्यांच्या ओघवत्या शैलीद्वारे मांडला आहे. शिवरायांवरील हे अलौकिक साहित्य प्रत्येक मराठी माणसानं एकदातरी ऐकायलाच हवं. ‘स्टोरीटेल’ या आघाडीच्या संस्थेनं पुढाकार घेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणादायी आवाजात 1983 साली ध्वनीमुद्रित केलेल्या ‘संपूर्ण शिवचरित्रकथनाचे’ पंधरा भाग खास इतिहास प्रेमी, साहित्यरसिकांसाठी ‘ऑडिओबुक’मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. खुद्द बाबासाहेब पुरंदरेंचे ओरिजन सादरीकरण ऐकण्याचा एक विलक्षण नजराना बाबासाहेबांच्या ‘शतकोत्सवी’ वर्षानिमित्त शिवप्रेमी साहित्यरसिकांना ‘स्टोरीटेल’नं दिला आहे.

पंधरा भागांची संपूर्ण ‘शिवचरित्रकथन’ व्याख्यानमाला बाबासाहेबांच्या प्रेरणादायी आवाजात स्टोरीटेलवर ऐकता येणार आहे. याशिवाय त्यांनी सांगितलेल्या हिरकणी, प्रतापराव गुजर, बुलंद बुरुज अशा ऐतिहासिक सात कथाही स्टोरीटेलवर स्वतंत्रपणे ऐकायला मिळणार आहेत. शिवप्रेमींसोबतच सर्वसामान्य साहित्यप्रेमीही बाबासाहेबांच्या वाणीतून हे ‘शिवचरित्रकथन’ ऐकताना एकरूप होतात. ‘शिवचरित्रकथन’मध्ये शिव पुर्वकाळ, शिव जन्म, बालपण, स्वराज्याची प्रतिस्थापना, स्वराज्य विस्तार, अफझल खान स्वारी, अफझल खान पराभव, पावन खिंड, फिरंगोजी नरसाळ, लाल महालावर छापा, सुरतेवर स्वारी, मिर्झाराजे जयसिंग, अग्र्यातून सुटका, तानाजी, राज्याभिषेक असा शिवकालीन इतिहास बाबासाहेबांच्या रसाळ वाणीतून इतिहासप्रेमींना ऐकायला मिळणार आहे.

‘स्टोरीटेल’ ही स्वीडिश कंपनी असून ती जगातील 21 हुन अधिक देशात आणि 25 हुन अधिक भाषेत ऑडिओबुक प्रकाशित व वितरित करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. सध्या भारतात मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषांसह 11 भारतीय भाषांतील पुस्तकं या अँपवर उपलब्ध आहेत. ही ऑडिओबुक्स कधीही कुठेही आणि कितीही ऐकता येऊ शकतात. मराठीमध्ये शिवचरित्र कथन बरोबरच इतिहास प्रेमींसाठी ना स इनामदार यांच्या झेप, झुंज अश्या कादंबऱ्या, गो. नि. दांडेकर यांच्या पडघवली, पवनाकाठचा धोंडी, कुण्या एकाची भ्रमणकथा, शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय, युगंधर यासारख्या लोकप्रिय कादंबऱ्या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहेत.

‘स्टोरीटेल’ या अॅपमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांतील दोन लाखांहून अधिक पुस्तके कधीही, कुठेही ऐकण्याची संधी आहे. ज्यामध्ये मराठी साहित्य विश्वातील नामवंत लेखकांपैकी ह. ना. आपटे, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, व. पु. काळे, रणजित देसाई, साने गुरुजी, सुनीता देशपांडे, अरूणा ढेरे आदी अनेकांचे सर्वोत्तम साहित्य स्टोरीटेल ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध आहे. हे सर्व साहित्य नामवंत अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, शुभांगी गोखले, संदीप कुलकर्णी आदींच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐकायला मिळेल.

संबंधित बातम्या

Anupam and Kirron Kher : सहजीवनाची 36 वर्ष, अनुपम खेरकडून किरणसाठी खास पोस्ट

Paris : चित्रपटाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर भाष्य!, 31 ऑगस्ट रोजी येणार ‘परीस’ प्रेक्षकांच्या भेटीला

14 वर्षांपूर्वी नागासोबत सीन, ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर मिलिंद गवळींचं ‘त्या’ बालकलाकाराशी रियुनियन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI