Vijay – Trisha : 31 व्या वर्षी साखरपुडा, तरीही अविवाहित त्रिशा, 11 वर्षांनंतर Engagement चे फोटो समोर, विजयसोबत अफेरच्या चर्चा
Vijay - Trisha : अभिनेत्री त्रिशा आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरलेला असतान, त्रिशा हिच्या साखरपुड्याचे फोटो समोर आहे आहे. 11 वर्षांपूर्वी त्रिशा हिचा साखरपुडा झालेला, जेव्हा अभिनेत्री 31 वर्षांची होती...

Trisha Krishnan Old Engagement Photo Viral: साउथ सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पण आता अभिनेत्री तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. त्रिशा हिच्या नावाची चर्चा तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत होत आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा रंगली आहे, कारण अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. विजय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला असताना, त्रिशा आणि विजय एका रिसेप्शन सोहळ्यात एकत्र दिसले. एवढंच नाही तर, जेव्हा विजय निवडून आले तेव्हा त्रिशा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचली. एवढंच नाही तर, मुख्यमंत्री शपथ विधी सोहळ्यात देखील त्रिशा आलेली. पण विजय यांची पत्नी आणि मुलं त्याठिकाणी नसल्यामुळे चर्चांनी अधिक जोर धरला. अशात त्रिशा हिच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.
11 वर्षांनंतर जुने फोटो आले समोर
खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना अभिनेत्रीचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामुळ इंटरनेटवर खळबळ माजली आहे… जे फोटो समोर आले आहेत, ते 11 वर्ष जुने आहे… रिपोर्टनुसार, 2015 मध्ये त्रिशा हिने उद्योजक वरुण मणियन याच्यासोबत साखरपुडाकेलेला. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
साखरपुडा झाला तेव्हा त्रिशा फक्त 31 वर्षांची होती. नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून, अभिनेत्री प्रचंड आनंदी होती. पण काही महिन्याच दोघांचं नात मोडलं… कारण वरूण याने लग्नाआधी एक अभिनेत्रीसमोर एक अट ठेवली होती, लग्नानंतर सिनेमात काम करायचं नाही… अशी अट वरुण मणियन याने ठेवली. म्हणून त्रिशा हिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
साखरपुडा मोडल्यानंतर त्रिशा हिने केलेला मोठा खुलासा…
जेव्हा त्रिशा हिच्या मोडलेल्या साखरपुड्याच्या चर्चा रंगू लागल्या, तेव्हा यावर ट्विट करत अभिनेत्री सत्य सर्वांना सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणालेली, ‘माझ्याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत, ज्या येथेच संपवा… मी आनंदी आहे, सिंगल आहे… आणि माझ्या आयुष्यासाठी आभारी आहे…’, एवढंच नाही तर, मुलाखतीत देखील अभिनेत्रीने साखरपुडा मोडल्याचं कारण सांगितलं होतं.
अभिनेत्री त्रिशा म्हणालेली, ‘ज्या व्यक्तीसोबत माझं लग्न होणार होती, त्याने मला सिनेविश्व सोडण्यास सांगितलं. पण सिनेमा सोडण्याऐवजी मी साखरपुडाच मोडला…’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा ब्रेक घेईल जेव्हा मी प्रेग्नेंट असेल..’, आता त्रिशा पुन्हा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
विजय यांच्यासोबत अभिनेत्रीचं नाव जोडलं जात आहे.
त्रिशा आणि विजय यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र काम केलं आहे. दोघांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण 2025 मध्ये जेव्हा विजय यांची पत्नी संगिता यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला, तेव्हा त्रिशा आणि विजय यांच्या नात्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला. पण दोघांनी देखील नात्यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.