AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालच आपण एकत्र जेवलो अन् आज..; त्रिशा कृष्णनला बसला मोठा धक्का, लिहिली भावनिक पोस्ट

पटकथेचा राजा म्हणून ओळखले जाणारे के. भाग्यराज यांच्या निधनाने संपूर्ण तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णनने त्यांच्या निधनानंतर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.

कालच आपण एकत्र जेवलो अन् आज..; त्रिशा कृष्णनला बसला मोठा धक्का, लिहिली भावनिक पोस्ट
Trisha KrishnanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2026 | 3:18 PM
Share

दिग्गज तमिळ दिग्दर्शक, अभिनेते आणि पटकथालेखक के. भाग्यराज यांचं शनिवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. के. भाग्यराज यांचं निधन हा तमिळ चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा धक्का आहे. त्यांचे चित्रपट पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांच्या जीवनाचा एक भाग बनले होते. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली. यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनचाही समावेश होता. तर दुसरीकडे अभिनेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी के. भाग्यराज यांच्या घरी जाऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.

त्रिशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘प्रिय भाग्यराज सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. विश्वासच बसत नाही की कालच आपण एकत्र जेवत होतो आणि आज मला ही हृदयद्रावक बातमी कळली. पूर्णिमा मॅम, शांतनू, अम्लू आणि किकी यांना या दु:खातून सावरण्याचं बळ मिळो.’ भाग्यराज हे नुकतेच अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गोव्याला गेले होते. चित्रपटसृष्टीतील इतर अनेकांसोबत त्रिशानेही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भाग्यराज हे अभिनेते चिरंजीवी यांचं स्वागत करताना दिसले होते.

त्रिशा कृष्णनची पोस्ट-

के. भाग्यराज यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा शांतनू, मुलगी सरन्या आणि पत्नी पूर्णिमा असा परिवार आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी के. भाग्यराज यांच्या तमिळ चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यांचं निधन हे चित्रपटसृष्टीसाठी कधीही भरून न निघणारं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलंय. के.

भाग्यराज हे ‘स्क्रिनप्ले किंग’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी 1979 मध्ये ‘सुवरिल्लथा चिथिरंगल’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी ‘अंधा 7 नाटकाल’, ‘मुंधनाई मुडिचू’, ‘चिन्ना वीडू’ आणि ‘एंगा चिन्ना रसा’ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट दिले. 17 दिवसांपूर्वीच त्यांचे गुरू आणि प्रख्यात चित्रपट निर्माते भारतीराजा यांचं निधन झालं होतं.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात