फिनाले वीकच्या आधीच ‘बिग बॉस 17’ची अवस्था वाईट; TRP यादीत ही प्रसिद्ध मालिका पहिल्या स्थानी

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला 'बिग बॉस 17' हा शो टीआरपीच्या यादीत मागे राहिला आहे. ग्रँड फिनालेच्या आधीच या शोचा टीआरपी घसरला आहे. बिग बॉसच्या ऐवजी दुसऱ्या एका लोकप्रिय मालिकेनं टीआरपीच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे.

फिनाले वीकच्या आधीच 'बिग बॉस 17'ची अवस्था वाईट; TRP यादीत ही प्रसिद्ध मालिका पहिल्या स्थानी
bigg boss 17 top 5 contestantsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 11:38 AM

मुंबई : 26 जानेवारी 2024 | टेलिव्हिजनवरील मालिका आणि शोज प्रेक्षकांकडून आवडीने पाहिल्या जातात. डेली सोप्स, रिॲलिटी शोज आणि आपल्या आवडत्या शोजची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करतात. यासोबतच प्रत्येक आठवड्यात कोणती मालिका किंवा शो टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, हे जाणून घेण्याचीही उत्सुकता चाहत्यांमध्ये असते. या आठवड्याच्या टीआरपी यादीत स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ या मालिकेचा जलवा कायम आहे. तर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या टीआरपीत थोडी वाढ होतेय. टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले येत्या 28 जानेवारी रोजी पार पडणार आहे. मात्र शेवटच्या आठवड्यातील टीआरपीमध्ये या शोची अवस्था वाईट आहे.

‘अनुपमा’ने मारली बाजी

टीव्हीवरील टॉप 10 शोजबद्दल बोलायचं झाल्यास नेहमीप्रमाणेच रुपाली गांगुलीची ‘अनुपमा’ ही मालिका चाहत्यांची सर्वांत आवडती मालिका ठरली आहे. या मालिकेत आलेला अमेरिकेचा ट्विस्ट चाहत्यांना आवडतोय. म्हणून टीआरपीच्या यादीत ही मालिका पहिल्या स्थानी आहे. या मालिकेला 2.7 रेटिंग मिळाली आहे. तर शक्ती अरोरा आणि भाविका शर्मा यांची ‘गुम है किसी के प्यार में’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका आहे. या मालिकेला 2.3 रेटिंग मिळाली आहे.

‘बिग बॉस 17’चा टीआरपी घसरला

टीआरपीच्या यादीत चौथ्या क्रमांकावरही स्टार प्लस वाहिनीवरच मालिका आहे. ‘इमली’ ही मालिका गेल्या काही आठवड्यांपासून चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 2.2 रेटिंग मिळाली आहे. तर पाचव्या क्रमांकावर सलमान खानचा बिग बॉस हा शो आहे. या आठवड्यात ‘बिग बॉस 17’ला 2.1 रेटिंग मिळाली आहे. 28 जानेवारी रोजी बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले आहेत.

हे सुद्धा वाचा

टीआरपीच्या यादीच सहाव्या स्थानी ‘झनक’ ही मालिका आहे. हिबा नवाबच्या या मालिकेला 2 रेटिंग मिळाली आहे. याशिवाय 2024 च्या तिसऱ्या आठवड्याच्या टीआरपी यादीत ‘पांड्या स्टोर’ने स्थान मिळवलंय. ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. मोहित मलिक आणि सायली सोलंकी यांची ‘बातें कुछ अनकही सी’ हा मालिका आठव्या स्थानावर आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवलं आहे. नवव्या स्थानी असलेल्या या कॉमेडी मालिकेला 1.8 रेटिंग मिळाली आहे. तर दहाव्या क्रमांकावर ‘तेरी मेरी डोरियाँ’ ही मालिका आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.