AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tunisha Case: तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी आरोपी शिझानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला..

अभिनेत्री तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी शिझानला बेल की जेल? पहिल्यांदाच आरोपीने दिली प्रतिक्रिया

Tunisha Case: तुनिशा शर्मा आत्महत्येप्रकरणी आरोपी शिझानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला..
| Updated on: Jan 02, 2023 | 9:46 AM
Share

वसई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी शिझान खानकडून आज (सोमवार) कोर्टात पहिला जामीन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी याबद्दलची माहिती दिली. वसई न्यायालयाने शिझानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी पहिल्यांदाच शिझानची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी निर्दोष आहे आणि मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे”, असं शिझान म्हणाला. वसई न्यायालयासमोर हजर होण्याआधी शिझानने त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली.

“मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष आहे, सत्यमेव जयते”, असं शिझानने म्हटल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं. पोलीस कोठडी संपल्यानंतर 28 वर्षीय शिझानला शनिवारी वाळीव पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं होतं. “सोमवारपर्यंत थांबा, मला त्याच्या कुटुंबीयांसोबत माध्यमांसमोर यावं लागेल. कारण अनेक तथ्यहीन गैरसमज पसरवले जात आहेत”, असं शिझानचे वकील म्हणाले.

शिझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी त्याला तुरुंगात घरचं जेवण मिळावं यासाठी चार अर्ज दाखल केले. दम्याच्या त्रासासाठी इनहेलर वापरण्याची परवानगी द्यावी आणि त्याचप्रमाणे कोठडीत असताना वकील आणि कुटुंबीयांशी भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिझानकडून करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर कोठडीत असताना माझे केस कापू नयेत आणि मला सुरक्षा द्यावी, अशीही मागणी शिझानने केली आहे.

‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन तुनिशाने आत्महत्या केली. आत्महत्येच्या 15 दिवस आधीच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. शिझानने तुनिशाला लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली, असा आरोप अभिनेत्रीच्या आईने केला. शिझानचं इतर तरुणींसोबतही अफेअर होतं, असाही आरोप केला जात आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.