‘त्याला माझ्यासारखं बालपण नाही देऊ शकत’, सिंगल फादर असलेल्या तुषार कपूरच्या लेकाला पाहिलंत का? सेम टू सेम वडिलांची कॉपी
बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने सिंगल फादर होण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांच्या पुस्तकात आणि मुलाखतीत देखील त्याने त्यांने सिंगल फादर म्हणून आलेली आव्हाने व्यक्त केले आहेत. तसेच त्याने त्याच्या मुलाच्याबाबतीत एक खंतही व्यक्त केली आहे.

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर आणि मुलगी एकता कपूर यांनी लग्न न करता सिंगल पालक होण्याचा निर्णय घेतला. तुषार कपूरने त्यांच्या पालकत्वाच्या अनुभवावर ‘बॅचलर डॅड’ हे पुस्तक लिहिले जे खूप चर्चेत होते. महिला एकट्या माता असतात हे सत्य लोकांनी स्वीकारले आहे, परंतु एकटे वडील असणे अजूनही एक मोठे आव्हान आहे. असेच अनुभव त्याने त्याच्या पुस्तकात लिहिले आहेत.
एकटा पिता असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
तसेच अनेकदा त्याने मुलाखतींमध्येही त्याच्या सिंगल फादर होण्याच्या अनुभवाबद्दल तो बोलला आहे. तो म्हणाला होता की, “एकटा पिता असणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला वाटते की हे आनंद माझ्या नशिबात लिहिलेले आहे. मला या भूमिकेत सर्वात जास्त आरामदायी वाटते. एकटा पिता होण्याचा निर्णय माझ्यासाठी योग्य होता. लक्ष्यच्या आगमनाने माझे आयुष्य आनंदाने भरले. मला पूर्ण वाटू लागले. माझा आत्मविश्वास वाढला.एक वडील म्हणून, मी लक्ष्यासोबत वाढतोय. मला वडिलांची भूमिका आणि वडील होण्याचा अनुभव समजत आहे.”
लक्ष्य खूप लहान असताना….
पुढे त्याने म्हटलं. “लक्ष्य खूप लहान असताना माझा दैनंदिन दिनक्रम त्याच्यानुसार ठरवला जात असे. आता तो त्याचे बहुतेक काम स्वतः करतो. तो अभ्यास आणि खेळात व्यस्त असतो. आता मी कोणत्याही काळजीशिवाय माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. असे असूनही, आम्ही फोनद्वारे संपर्कात राहतो. मी लक्ष्याच्या दैनंदिन कामांवर पूर्ण लक्ष ठेवतो.” असं म्हणत तुषार हळूहळू पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय होणार असल्याची कल्पना त्याने दिली आहे.
सिंगल फादर होण्याचा निर्णय
माझ्या आईवडिलांशिवाय सिंगल फादर होण्याचा माझा निर्णय शक्य नव्हता. जेव्हा मी सिंगल फादर होण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांना हे सत्य पचवणे सोपे नव्हते. पण जेव्हा मी त्यांच्याशी माझ्या भावना शेअर केल्या तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला पाठिंबा दिला. ते आजी-आजोबा होत आहेत याचा त्यांना आनंद झाला.
View this post on Instagram
मला जोडीदार नाही त्यामुळे…
तुषारने सिंगल फादर होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. तो म्हणाला ” माझ्या आईवडिलांनी मला समजावून सांगितलं की सिंगल फादर होणे ही एक मोठी जबाबदारी आहे. आम्ही आजी-आजोबांची भूमिका बजावू शकतो. पण मुलासाठी तुला त्याच्या आई आणि वडिलांची भूमिका एकट्यानेच पार पाडावी लागेल. जर तू ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार अशील तर आम्हाला तुझ्या निर्णयाबद्दल कोणतीही तक्रार नाही.एकटा वडील असल्याने माझी जबाबदारी आणखी वाढते. माझ्या मुलाच्या जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी मला जोडीदार नाही. कामावरून परतल्यानंतर मी लक्ष्याशी त्याच्या दिवसभराच्या कामांबद्दल बोलतो. मी त्याच्यासोबत खेळतो. मी त्याच्या अभ्यासाची काळजी घेतो. जेव्हा मी लक्ष्यसोबत असतो तेव्हा माझा सर्व ताण कमी होतो.”
मी लक्ष्यला माझ्यासारखे बालपण देऊ शकत नाही
पुढे तुषारने त्यांच्या बालपणीचे दिवस आठवत म्हटलं, “एकता आणि मी लहान असताना, आम्ही आमच्या इमारतीतील मुलांच्या घरी जायचो आणि मोकळेपणाने खेळायचो. त्यावेळी कोणाच्याही घरी येण्या-जाण्यावर बंधन नव्हते. आम्ही एकत्र खेळायचो, एकत्र पिकनिकला जायचो. पण आता तसं नाही. आता मुलांनी त्यांच्या मित्रांच्या घरी कोणत्याही बंधनाशिवाय जाणे बंद केले आहे. लोकांनी कुटुंबाच्या सहलींचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. आता आमच्यासारखे निश्चिंत बालपण राहिलेले नाही. कधीकधी मला वाईट वाटते की मी लक्ष्यला माझ्यासारखे बालपण देऊ शकत नाही. आम्ही अनेकदा मुलांसाठी सहलींचे नियोजन करतो जेणेकरून त्यांना एकत्र खेळण्याची संधी मिळेल. आता मैत्रीचे मार्ग बदलले आहेत.” असं म्हणत त्याने ती एक खंत व्यक्त केली.
