अर्जुन बिजलानीचा गोव्यात अपघात, जखमी अवस्थेतील फोटो समोर
Arjun Bijlani Accident: प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी याचा गोव्यात अपघात, खुद्द अभिनेत्याने पोस्ट केलेत जखमी अवस्थेतीत फोटो, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याने चाहत्यांना दिली अपघाताची माहिती...

‘मिले जब हम तुम’, ‘नागिन’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अर्जुन बिजलानी याचा अपघात झाला आहे. खुद्द अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघात झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्यानेत्याने जखमी अवस्थेत फोटो देखील पोस्ट केली आहे. अभिनेत्याचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. शिवाय अनेकांनी अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारणा देखील केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन कुटुंबासोबत गोव्यात सुट्ट्यांसाठी गेला होता. सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना अभिनेत्याचा गोव्यात अपघता झाला. अपघातानंतर अभिनेत्याने फोटो पोस्ट केले आहे. पण आता अर्जुन याची प्रकृती स्थिर असून मुंबईत परतल्यानंतर अभिनेता कामावर देखील हजर झाला आहे.

अर्जुन बिजलानी याने इन्स्टाग्रामवर फोटोंचा कोलाज करत स्टोरीमध्ये पोस्ट केला. फोटोंमध्ये अभिनेत्याच्या पायांना दुखापत झाल्याचं चित्र दिसत आहे. अभिनेत्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अपघात नक्की कसा झाला? याबद्दल अभिनेत्याने काहीही सांगितलं नाही. सध्या सर्वत्र अर्जुन बिजलानी याची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
अर्जुन याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने ‘मिले जब हम तुम’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘नागिन’, ‘इश्क में मरजावां’, ‘रुहानियत’, ‘शिव-शक्ति’, Splitsvilla, ‘इंडियाज गॉट टैलेंट’ आणि ‘डांस दीवाने’ यांसारख्या अनेक मालिका आणि शोमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
अर्जुन बिजलानी याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
