Shweta Tiwari : तू 2 लग्नं केलीस आता पलकही 5 वेळा… लेकीला घेरणाऱ्या ट्रोलर्सना श्वेता तिवारीने सुनावलं
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या कामासोबतच तिच्या पर्सनल लाईफची देखील खूप चर्चा होत असते. दोन लग्न मोडल्यामुळे श्वेताला लोकांनी केलेल्या ट्रोलिंगचा खूप सामना करावा लागला. एवढचं व्हे तर श्वेताची लेक अभिनेत्री पलक तिवारीसुद्धा बऱ्याचदा लोकांच्या निशाण्यावर असते.

‘कसौटी जिंदगी की’, ‘परवरिश’, ‘मेरे डॅड की दुल्हन’ यासारख्या अनेक हिट टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी. तिचं काम जेवढं चर्चेत असतं तेवढीच चर्चा तिच्या लूक्सची आणि पर्सनल लाईफची देखील होते. खरंतर श्वेताचं पहिलं लग्न राजा चौधरीशी झालं होतं. मात्र लग्नाच्या 14 वर्षांनंतर श्वेता आणि राजा चौधरी वेगळे झाले. त्यानंतर काही काळाने श्वेताने पुन्हा लग्नगाठ बांधली. अभिनेता अभिनव कोहलीशी तिने लग्न केलं. मात्र दुर्दैवाने तिचा हा विवाहसुद्धा फार काळ टिकला नाही. तिने पुन्हा घटस्फोट घेतला. लग्नात दोनदा अपयशी ठरलेल्या, विभक्त झालेल्या श्वेताला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलर्सचा धीटपण सामना करणारी, त्याना खडे बोल सुनावणारी श्वेता आपल्या लेकीमुळे, पलकमुळे खूप भावूक होते. पलकलाही अनेकदा ट्रोल केलं जातं, पण यावेळी मुलीला टार्गेट करणाऱ्यांना श्वेताने थेट सुनावलं आहे.
एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत श्वेताने तिचा अनुभव सांगितलं. माझ्या पर्सनल लाईफमुळे लोकं माझ्या मुलीलाही जज करतात. काही लोकं तर मर्यादा ओलांडतात, म्हणतात की तू ( श्वेता) दोन लग्नं केलीस,आता तुझी मुलगी पलक ही तर 5 लग्न करेल. मात्र लोकांच्या या कमेंट्सवर आता श्वेतानेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ” पलकने लहान वयातच खूप काही पाहिलं आहे, सोसलं आहे. ते सगळं पाहिल्यावर ती लग्न करेल की नाही याचीच माझ्या मनात शंका आहे. 27 व्या वर्षी जेव्हा माझा पहिला घटस्फोट झाला, तेव्हा मी विचार केला की यापेक्षा वाईट आणखी काय होऊ शकतं. एखाद्या टॉक्सिक रिलेशनमध्ये राहण्यापेक्षा सिंगल पॅरेंट बनणं, एकल पालकत्व निभावणं जास्त योग्य आहे. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांची जडणघडण, त्यांचा सांभाळ मीच केला, ” असं श्वेताने नमूद केलं.
View this post on Instagram
तिसऱ्या लग्नाबद्दलही मिळतात सल्ले
दोन लग्नांनंतर, घटस्फोटानंतर आता श्वेता तिसरं लग्न कधी करणार असा सवालही तिला विचारला जातो. त्यावरूनही तिने थेट उत्तर दिलंय. आपला समाज असा आहे ना की तुम्ही जर 10 वर्ष ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असाल आणि नंतर ते नातं तुटलं तर कोणीही तुम्हाला काहीच प्रश्न विचारत नाही. पण जर 2 वर्षांत तुमचं लग्न मोडलं तर सगळे जण येऊन-येऊन तुम्हाला प्रश्न विचारून भंडावून सोडतात. माझ्याबद्दलही बरेच लोकं बोलतात की ही आता आणखी किती वेळा लग्न करणार ? काही लोकांनी तर मला असाही सल्ला दिला की मी तिसरं लग्न अजिबात करू नये. पण मी त्यांच्याकडे सल्ला मागितलाय का ? माझ्या जीवनात कोम आहे, कोण नाही हे तरी मी त्यांना सांगितलंय का ? जो काही निर्णय घ्यायचा असेल तो माझा असेल, माझ्यासाठी निर्णय घेण्याचा हक्क इतरांना कोणी दिला ? माझं आयुष्य कसं घालवायचं याचा निर्णय मी घेईन, मला काय करायचं आहे ते मीच ठरवेन, असं श्वेता म्हणाली.
View this post on Instagram
