Bigg Boss 19 : ‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस 19’ चा प्रीमियर, स्पर्धकांची नावंही समोर, जाणून घ्या पटापट
'बिग बॉस 19'ची सर्वांनाच उत्सुकता असून सलमानचे चाहतेही या शोची आवर्जून वाट पहात आहेत. यंदाची थीम काय, स्पर्धक कोण असणार आणि मुख्य म्हणजे हा शो नेमका कधीपासून सुरू होणार ? चला जाणून घेऊया..

‘बिग बॉस’ या रिॲलिटी शो बद्दल लोकांच्या मनात अनेक वर्षांपासून क्रेझ आहे. बऱ्याच लोकांनी पहिल्या सीझनपासून हा शो पाहिला असून आजही ते या शोची आणि सलमानची आतुरतेने वाट पहात असतात. बिग बॉस हा टीव्हीवरील सर्वाधिक टीआरपी देणाऱ्या शोपैकी एक सून सलमानचं होस्टिंगही अनेकांना खूप आवडतं. आतापर्यंत ‘बिग बॉस’चे 18 सीझन प्रसारित झाले आहेत. याशिवाय, बिग बॉस ओटीटीचे तीन सीझन डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केले गेले आहेत. प्रेक्षक आधी ‘बिग बॉस ओटीटी’च्या चौथ्या सीझनची वाट पाहत होते, पण यावेळी काही कारणास्तव ते येणार नाही. या शोच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर आली आहे. कारण आता ‘बिग बॉस’चा 19 वा सीझन येणार असून त्याची तारीखही समोर आली आहे.
यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की ‘बिग बॉस 19’ यंदा ऑक्टोबरमध्ये नाही तर 19 जुलैपासून सुरू होणार आहे, पण त्याची कोणीही पुष्टी केलेली नव्हती, मात्र आता ताज्या रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 19’ या सीझनची प्रसतावित तारीख समोर आली असून तो 3 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतो अशी चर्चा आहे. मात्र असं असलं तरीही बिग बॉस 19 च्या प्रीमिअरच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस 19’ चा कार्यक्रम वाढवला जाऊ शकतो. तसेच या सीनमध्ये हंगामात कोणताही YouTuber किंवा Instagram इन्फ्लुएंसर्स हे या शोचा भाग नसतीला, असाही दावा करण्यात आला हे. तसेच प्रॉडक्शनशी संबंधित समस्यामुळे यंदा बिग बॉस OTT चा सीझन येणार नाही. टेलि चक्करच्या रिपोर्टनुसार,निर्माते ‘बिग बॉस 19’ हा जुन्या थीमसह प्रेक्षकांपुढे आणणार आहेत.
सलमान खानची सीक्रेट रूम
‘बिग बॉस 19’ मध्ये सलमान खानची एक सीक्रेट खोली असेल ज्यामध्ये काही नॉमिनेटेड स्पर्धकांना ठेवण्यात येईल. त्यामुळे ते बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या स्पर्धकांना पाहू शकतील. तसेच कोणत्याही टास्कद्वारे एव्हिक्शन नसेल तर प्रेक्षकांच्या सर्वेक्षणानुसार यावेळी सदस्यांचे एव्हिक्शन होईल असा दावाही अहवालात केला जात आहे. स्पर्धकांना फक्त टास्कद्वारे घराचे रेशन मिळेल.
‘बिग बॉस 19’ चे स्पर्धक
या शोमधील संभव्य स्पर्धकांची नावेही समोर आली आहेत. यामध्ये कोरिओग्राफर-अभिनेत्री डेझी शाह, तनुश्री दत्ता, फैजल शेख उर्फ फैजू, खुशी दुबे, विक्रम सिंह चौहान, राम कपूर, शशांक व्यास आणि लक्ष्य चौधरी यांच्या नावाचा समावेश आहे. पण या नावांची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे. ‘बिग बॉस 19’ च्या प्रीमियरची तारीख आणि स्पर्धकांची नावे लवकर अधिकृतपणे जाहीर केली जातील असे समजते.
