'तुझ्यात जीव रंगला'मधून राणादा आऊट?

झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

twist in Tujhyat Jeev Rangala serial Rana da alis hardik joshi may leave serial, ‘तुझ्यात जीव रंगला’मधून राणादा आऊट?

Tujhyat Jeev Rangala मुंबई : झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या मालिकेतील राणा दा आणि पाठक बाई यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण आता या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवरील काही फोटो लिक झाल्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. राणादाचा मालिकेत मृत्यू होणार असल्याची चर्चा रंगतेय. जर असं झालं तर राणादा हे पात्र पुन्हा मालिकेत दिसणार नाही. आता या पात्राचा मालिकेतील प्रवास संपला की हार्दिक जोशीने मालिका सोडली हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.पण लाडक्या हार्दिकने जर मालिका सोडली तर चाहत्यांचा हिरमोड होईल हे नक्की!

झी मराठीवरील घराघरात पोहोचलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला हे आश्चर्यकारक वळण म्हणावं लागेल. या मालिकेचा हिरो राणादा अर्थात हार्दिक जोशी बाहेर होणार आहे. या मालिकेत राणादाचा मृत्यू दाखवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राणादा या पात्राचा प्रवास इथेच थांबेल. मात्र यामागील खरं कारण वेगळंच असल्याची चर्चा मालिका विश्वात रंगली आहे.

अभिनेता हार्दिक जोशीनं मालिका सोडली की ट्रॅक फिरवला, असा प्रश्न आहे. लाडक्या राणादा उर्फ हार्दिक जोशीच्या एक्झिटचं कारण सध्यातरी गुलदस्त्यात आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 ते 8 यादरम्यान  पाहायला मिळते. गेल्या तीन वर्षांपासून या मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.  धनश्री काडगावकर (नंदिता), राज हानचांगले (सनी दा), छाया सानगावकर (गोदाक्का), अमोल नाईक (बरकत), दिप्ती सोनावणे (चंदा) हे कलाकार यातील काही प्रमुख भूमिकेत आहेत.

तुझ्यात जीव रंगला ही मालिका 3 ऑक्टोबर 2016 पासून सुरु आहे. या मालिकेत हार्दिक जोशी (राणादा) या मुख्य भूमिकेत दिसत आहे. तर अक्षया देवधर (अंजली पाठक अर्थात पाठक बाई) ही प्रमुख स्त्री भूमिका साकारत आहे. या दोघांची प्रेमकहाणी, लग्न, संसार असं या मालिकेचं चित्र आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *