नाना पाटेकर यांच्यासमोरच उत्तर प्रदेशच्या DGP चीं भन्नाट तक्रार, उपस्थितींना हसूच आवरेना! काय केला सवाल?
Uttar Pradesh DGP on Nana Patekar: एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालकांनी नाना पाटेकर यांना पाहताच एक भन्नाट तक्रार केली. त्यांच्या या मिश्किल प्रश्नाने सभेत एकच हाश्या पिकला. त्यांच्या तक्रारीनंतर तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही. काय आहे ती तक्रार?

एका कार्यक्रमादरम्यान नाना पाटेकर यांना उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी (DGP) एक भन्नाट तक्रार केली. त्यांच्या या प्रश्नाने या सभेत एकच हास्य पिकला. अर्थात ही तक्रार हिंदी चित्रपटातील पोलिसांच्या भूमिकेविषयी होती. हिंदी सिनेमात अनेकदा गुन्हा घडल्यानंतर अथवा खलनायकाने सगळ्यांना त्रास दिल्यानंतर, मारामारी झाल्यानंतरच पोलीस पोहचतात हे आपण पाहिले आहे. सिनेमात पोलीस गुन्हा घडल्यानंतरच नेहमी उशिरानेच येतात, असे दाखवण्यात येते. त्यावरून डीजीपींनी मजेशीर तक्रार केली. सिनेमात पोलीस उशीराच का येतात? असा सवाल त्यांनी करताच एकच हास्यकल्लोळ उठला.
आता नाना पाटेकर योग्य कारवाई करतील
या कार्यक्रमात उत्तर प्रदेशमधील पोलीस महासंचालकांनी चित्रपटातील पोलीसांच्या उशीरा होणार्या एंट्रीवर सवाल केला. सिनेमात नेहमी पोलीस उशीराच का येतात असा तक्रारीचा सूर त्यांनी आवळताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत हास्याचा ठेका धरला. या ठिकाणी आता नाना पाटेकर उपस्थित आहेत. त्यामुळे तक्रार नोंदवल्यानंतर त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. या हास्यविनोदाला पाटेकर यांनीही मनमुराद दाद दिली.
लघुपटात नाना पाटेकर
उत्तर प्रदेश पोलिसांनी सायबर फसवणूक आणि डिजिटल अरनेस्टच्या घटनांविरोधात जाणीव जागृतीसाठी नाना पाटेकर यांच्यासोबत एक लघुपट तयार केला आहे. या लघुपटात नाना पाटेकर एका जागरुक नागरिकाची भूमिका साकारत आहेत. सायबर फसवणुकीचा डाव वेळीच ओळखून त्याविरोधात ते लढा उभारताना या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांची भूमिका उल्लेखनीय आहे. या लघुपटामुळे समाजात सायबर फसवणुकीविरोधात जागरूकता येईल असा पोलिसांचा विश्वास आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना डिजिटल अरनेस्टच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन या कार्यक्रमादरमान केले. हिंदी चित्रपटातील पोलिसांच्या भूमिकेवर डीजीपींनी मिश्किल टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यावर नाना पाटेकर यांनाही हसू आवरले नाही.
दिनांक 14 अगस्त, 2026 को लोक भवन, लखनऊ में माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश श्री योगी आदित्यनाथ जी की गरिमामयी उपस्थिति में उत्तर प्रदेश पुलिस की साइबर-जागरूकता लघु फिल्म ‘Scam Files’ का विशेष प्रदर्शन किया गया। इस अवसर पर फिल्म के मुख्य अभिनेता, दिग्गज कलाकार श्री नाना पाटेकर जी… pic.twitter.com/Y6DOV7ZIIl
— DGP UP (@dgpup) August 15, 2026
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने लिहिले की, सर आजही तशीच परिस्थिती आहे. तर दुसऱ्याने तुम्ही बरोबर बोललात सर, त्यात नवीन काही नाही, अशी टिप्पणी केली. तर एका युझरने नाना पाटेकर यांच्या तिरंगा चित्रपटाचा उल्लेख केला. तर एका युझरने पोलिसांनाच एकदम खणखणीत टोला हाणला. हे नाटक बंद करा सर, किमान चित्रपटांमध्ये तरी पोलीस वेळेवरच येतात, अशी प्रतिक्रिया दिली.