Urfi Javed : वाढदिवसनिमित्त उर्फी जावेदला इतकं भन्नाट सरप्राइज; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी आणि जगावेगळे कपडे हे जणू समीकरणच आहे. हेच समीकरण लक्षात ठेवत एका अभिनेत्रीने तिला वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

Urfi Javed : वाढदिवसनिमित्त उर्फी जावेदला इतकं भन्नाट सरप्राइज; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!
Urfi JavedImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 4:41 PM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रविचित्र कपडे हे जणू समीकरणच झालं आहे. त्यामुळे उर्फी जेव्हा सर्वसामान्य कपड्यांमध्ये समोर येते, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या उर्फी नाही तर दुसरी एक अभिनेत्री तिच्यामुळे चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत आहे. सोशल मीडियावर राखी सावंतचे दररोज नवीन कारनामे पाहायला मिळतात. पापाराझींनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये राखी नेहमीच काही ना काही ड्रामा करताना दिसून येते. आता नुकतंच तिने उर्फीच्या वाढदिवसानिमित्त तिला भन्नाट सरप्राइज दिलं आहे. या सरप्राइजचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

राखी सावंतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या कारमधून बाहेर पडताना दिसते. मात्र यावेळी तिचे कपडे हे जगावेगळे आहेत. राखीने खाली स्पोर्ट्स पॅन्ट परिधान केली आहे तर वर तिने प्लास्टिकची पिशवी ओढून घेतली आहे. त्यातून बाहेर पाहता यावं यासाठी पिशवीला तिने डोळ्यांजवळ दोन भोकं पाडली आहेत. राखीचा हा अजब अंदाज पाहून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. उर्फीचा वाढदिवस असल्याने तिला खास सरप्राइज दिल्याचं राखीने म्हटलंय. मात्र तिचा हा लूक खूपच हास्यास्पद असल्याचं नेटकरी म्हणतायत.

हे सुद्धा वाचा

‘एक उर्फी कमी होती का? आता त्यात राखीचीही भर पडली’, असं एकाने लिहिलं. तर ‘एक वेडी आधीच होती. त्यात आणखी एकीची भर पडली,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘भंगारवाली’ अशीही टीका नेटकऱ्यांनी राखीवर केली आहे. ‘हिला उपचाराची गरज आहे,’ असंही काहींनी म्हटलंय.

पहा व्हिडीओ

उर्फी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळेही चर्चेत होती. ‘इंडिया टुडे’च्या एका कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला होता, “जेव्हा मास्क हटवला जातो, तेव्हा उर्फी जावेद घरी कशी असते? कॅमेरासमोर नसताना तू कसं राहतेस? तू जेव्हा प्रार्थना करतेस किंवा कुटुंबीयांची भेट घेतेस, तेव्हा कशी असतेस?” या प्रश्नाचं उत्तर देताना उर्फी म्हणाली, “मी विवस्त्रच राहते. मी इतकं महागडं 3 बीएचके घर विकत घेतलं आहे. आधी एकाच घरात खूप लोक राहायचे. मात्र आता मी स्वत:चं मोठं घर खरेदी केलं आहे. त्यामुळे माझ्या घरी मी विवस्त्रच राहते. मला तसं राहायला आवडतं.”

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.