Urfi Javed: “…तर मी जेलमध्ये जाण्यास तयार”; उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना आव्हान

चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर भडकली उर्फी; म्हणाली "राजकारणी कुठून किती पैसा कमावतात हे जगाला.."

Urfi Javed: ...तर मी जेलमध्ये जाण्यास तयार; उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना आव्हान
'चित्रा अशी कशी गं तू सास...', उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 8:49 AM

मुंबई: आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेदसमोर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन अडचण निर्माण झाली आहे. कारण उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवण्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला. या तक्रारीनंतर उर्फी चांगलीच भडकली आहे. उर्फीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चित्रा वाघ यांना आव्हानच दिलं आहे.

चित्रा वाघ यांना उर्फीचं आव्हान

‘मला ट्रायल किंवा हा मूर्खपणाच नकोय. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत’, अशी पोस्ट उर्फीने लिहिली.

हे सुद्धा वाचा

‘प्रसिद्धीसाठी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार’

उर्फीने आणखी एका पोस्टद्वारे चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे. ‘आणखी एका राजकारण्याने दाखल केलेल्या तक्रारीपासून माझ्या नव्या वर्षाची सुरुवात झाली. कारण या राजकारण्यांकडे खरं कोणतं कामच नाही. हे राजकारणी, वकील मूर्ख आहेत का? संविधानात असा कोणता कलमच नाही, ज्याच्या आधारे मला तुरुंगात पाठवलं जाऊ शकेलं. अश्लीलता आणि न्युडिटीची संकल्पना ही त्या त्या व्यक्तीनुसार बदलते. माझ्या शरीराचा ठराविक भाग दिसत नसेल, तर तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकणार नाही. हे सर्व फक्त मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सुरू आहे’, अशी टीका तिने केली.

उर्फीने या पोस्टमध्ये चित्रा वाघ यांना सल्लासुद्धा दिला आहे. ‘माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली कल्पना आहे. मानवी तस्करी आणि सेक्स ट्रॅफिकिंग यांसारख्या घटना अजूनही मुंबईत घडत आहेत, त्याबद्दल तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करा. अनधिकृत डान्स बार बंद करा, ज्या अजूनही चालू आहेत’, असं तिने लिहिलं.

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.