उर्फी जावेदचा पोल डान्स करताना तोल गेला अन् ती धाडकन आपटली
अतरंगी कपडे आणि अजब-गजब स्टाइलसाठी प्रसिद्ध असणारी उर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोल डान्स करत असताना तिचा तोल जातो अन् ती धाडकन खाली पडताना दिसत आहे.

अतरंगी कपडे आणि अजब-गजब स्टाइलसाठी प्रसिद्ध असणारी उर्फी जावेद कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. शक्यतो तर उर्फी तिच्या कपड्यांमुळेच जास्त चर्चेचा विषय ठरते. पण आता उर्फीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ उर्फीच्या अतरंगी कपड्यांबद्दलचा नाहीये तर तिच्या पोल डान्सचा आहे.
उर्फीचा पोल डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हडीओमध्ये उर्फी पोल डान्स करताना दिसत आहे.यावेळी तिच्यासोबत एक प्रसंग घडतो. उर्फी जावेदचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. उर्फी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नेहमी ती तिचे हटके व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांना इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
पोल डान्स करताना उर्फीचा तोल गेला अन्….
नुकताच उर्फीने तिचा पोल डान्स करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा पोल डान्स करत असताना तिचा तोल जातो आणि ती धाडकन खाली पडते. मात्र तेवढ्यात तिची ट्रेनर येते आणि तिला वाचवते.स्पोर्ट्स ब्रा आणि जांभळ्या रंगाची शॉर्ट परिधान करून पोल डान्स करण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
तिची ट्रेनर तिला यात मदत करत आहे, पण अचानक उर्फीचा तोल जातो आणि ती खाली पडते. मात्र, तिची ट्रेनर धावत येऊन तिची मदत करते त्यामुळे ती एका मोठ्या अपघातातून वाचते.
उर्फी जावेदच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत. काही युजरस् तर तिच्या या पोल डान्सचे कौतुक करत आहेत. मात्र, अनेक चाहते तिच्या या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
View this post on Instagram
उर्फी जावेदच्या कामाबद्दल बोलायचं…
सध्या उर्फी जावेद अनेक टीव्ही शोमध्ये दिसत आहे. उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दर्गा, बडे भैया की दुल्हनिया यांसारख्या टीव्ही शो मध्ये दिसत आहे. पण उर्फी जावेदला बिग बॉसमधून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. याच शोमधून ती रातोरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. यानंतर उर्फी तिच्या हटके फॅशनमुळे चर्चेत राहू लगाली. तसेच ती वेब सीरिजही करत असून उर्फी फॅशनसोबत अभिनयातही तिचा जलवा दाखवत आहे.