AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उर्मिला कानेटकरने आधिच दिलेली घटस्फोटाची मोठी हिंट; म्हणालेली, ‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य…’

अभिनेता आदिनाथ आदिनाथ कोठारे याने अखेर अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केली आहे. पण काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्रीने घटस्फोटावर पहिल्यांदा मोठं वक्तव्य केलेलं. आता घटस्फोटानंतर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

उर्मिला कानेटकरने आधिच दिलेली घटस्फोटाची मोठी हिंट; म्हणालेली, 'प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य...'
Urmila Kanetkar
| Updated on: Jul 16, 2026 | 3:32 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता , दिग्दर्शक, निर्माता आदिनाथ कोठारे यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. फेसबूकवर एक पोस्ट करत आदिनाथ याने घटस्फोटाची घोषणा केली आहे. पण सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी उर्मिला हिने घटस्फोटाच्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलेलं. अभिनेत्री म्हणालेली, ‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतातच असं नाही…’ तर जाणून घ्या उर्मिला तेव्हा नेमकं काय म्हणालेली.

घटस्फोटाच्या चर्चांवर अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सोशल मीडियावर काय बोललं जातं आणि काय नाही याचा मी फार विचार करत नाही… त्या चर्चा टॉक्सिकच असतात… सोशल मीडियावरील काही चर्चा खऱ्या असतात, तर काही खोट्या… मी माझ्या कामात इतकी व्यस्त असते की, कोण काय बोलत आहे… यावर लक्ष देणं मला फारसं गरजेचं वाटत नाही…

‘प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतात असं देखील नाही… म्हणूनच लोकांनी देखील सोशल मीडियावर व्हयरल होणाऱ्या सर्वांत गोष्टींवर खरेपणाचा शिक्का मारणं देखील योग्य नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

आदिनाथ कोठारे याची घटस्फोटावर सोशल मीडिया पोस्ट

आदिनाथ याने फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आणि मी आणि उर्मिला परस्पर सहमतीने घटस्फोट घेत आहोत, अशी घोषणा केली. ‘जोडीदार म्हणून आमचा प्रवास संपत असला तरी, आमची लेक जिजा हिच्यासाठी आम्ही कायम एकत्र असू… तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत आहोत.’

‘आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील… आयुष्याच्या नव्या टप्प्यावर देखील तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठिशी असेच राहतील, अशी आम्हाला आशा आहे… म्हणूनच आमच्या या खासगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा… अशी आमची नम्र विनंती’ असं देखील अभिनेता पोस्टमध्ये म्हणाला आहे.

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांचं नातं

एकत्र काम करत असताना उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांच्यामध्ये मैत्री झाली आणि कालांतराने दोघांच्या नात्याचं रुपांतर प्रेमात झाले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये आदिनाथ आणि उर्मिला यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2017 मध्ये दोघांनी गोंडस लेक जिजा हिचं जगात स्वागत केलं. पण तरी देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा