AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zakir Hussain Filmography: ‘मुगल ए आजम’ मध्ये झाकीर हुसैन यांना ऑफर झाला होता ‘हा’ रोल, या चित्रपटातही झळकले उस्ताद

Zakir Hussain Filmography : पद्म विभूषण झाकिर हुसैन यांनी फक्त तबल्याच्या ठेक्यानेचे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं नाही तर त्यांनी चित्रपटांत अभिनयही केला. दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर , मधुबाला यांच्या ‘मुगल ए आजम’ चित्रपटातही त्यांना एक रोल ऑफर झाला होता.

Zakir Hussain Filmography: ‘मुगल ए आजम’ मध्ये झाकीर हुसैन यांना ऑफर झाला होता 'हा' रोल, या चित्रपटातही झळकले उस्ताद
उस्ताद झाकिर हुसेनImage Credit source: social media
| Updated on: Dec 16, 2024 | 12:34 PM
Share

संगीताच्या दुनियेतील उस्ताद, तबल्याच्या तालाने सर्वांनांच मंत्रमुग्ध करणारे , पद्मविभूषण उस्ताद झाकिर हुसेन यांच्या निधनाने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शोककळा पसरली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत विश्वातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 2002 मध्ये पद्म आणि 2023 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने झाकिर हुसेन यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

झाकिर हुसेन यांनी खूप लहान वयापासूनचे तबला वाजविण्यास सुरूवात केली होती. तबलावादनातच करिअर करताना त्यांनी आपलं संपूर्ण जीवन या कलेसाठी समर्पित केलं होतं. संगीत क्षेत्रात त्यांनी जे योगदान दिलं ते कोणीच विसरू शकत नाही. मात्र संगीत क्षेत्राव्यतिरिक्त त्यांनी काही चित्रपटांतही काम केलं आणि ते मोठ्या पडद्यावर झळकले. एवढंच नव्हे तर ‘मुगल ए आजम’ या गाजलेल्या चित्रपटातही त्यांना एक रोल ऑफर झाला होता. चला जाणून घेऊया त्यांची फिल्मोग्राफी..

झाकिर हुसेन यांचा डेब्यू

उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा हे देखील प्रसिद्ध तबलावादक होते. 1983 साली आलेल्या ‘हीट अँड डस्ट’ नावाचा एक हॉलिवूडमधील चित्रपट रिलीज झाला, त्याच चित्रपटाद्वारे झाकिर हुसेन यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची देखील भूमिका होती. विख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासहदेखील झाकिर हुसेना यांनी एका चित्रपटात काम केलं, तो चित्रपट म्हणजे ‘साज’. 1997 साली आलेल्या या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती.

एवढंच नव्हे तर 2021 साली आलेल्या ‘चालीस चौरासी’ या चित्रपटातही झाकिर हुसेन झळकले होते. तसेच यावर्शी प्राइम व्हिडीओवर आलेल्या देव पटेल यांच्या ‘मंकी मॅन’ या चित्रपटातही त्यांची भूमिका होती. या चित्रपटात ते तबला मेस्ट्रो म्हणूनच झळकले.

‘मुगल ए आजम’ मध्ये ऑफर झाला होता हा रोल

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात ऐतिहासिक चित्रपट ‘मुघल-ए-आझम’मध्ये काम करण्याची ऑफरही झाकीर हुसैन यांना मिळाली होती. दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर, मधुबाला यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात दिलीप कुमार यांनी सलीमची भूमिका साकारली होती, तर झाकीर हुसेन यांना सलीमच्या धाकट्या भावाची भूमिका ऑफर झाली होती. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली. खरंतर झाकिर हुसैन यांनी फक्त संगीतावर फोकस करावे, अशी त्यांच्या वडिलांची उस्ताद अल्लारखा यांची इच्छा होती. वडिलांकडून परवानगी न मिळाल्याने झाकिर हुसैन यांनी ‘मुगल ए आजम’ चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

Follow Us
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?