AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा वर्षा उसगांवकरांनी केलं होतं टॉपलेस फोटोशूट; झाली होती प्रचंड टीका

वयाची पन्नाशी ओलांडलेल्या वर्षा (Varsha Usgaonkar) आजही तितक्याच सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्यापुढे तरुण अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतील.

जेव्हा वर्षा उसगांवकरांनी केलं होतं टॉपलेस फोटोशूट; झाली होती प्रचंड टीका
Varsha UsgaonkarImage Credit source: Instagram/ Varsha Usgaonkar
| Updated on: Feb 28, 2022 | 7:35 AM
Share

दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्याने अभिनेत्री (Marathi Actress) वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंमत जंमत या पहिल्याच चित्रपटापासून त्या लोकप्रिय झाल्या होत्या. वर्षा यांनी मराठी, हिंदी, बंगाली, भोजपुरी, कोंकणी, राजस्थानी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नव्वदच्या दशकात त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. वयाची पन्नाशी पार केलेल्या वर्षा आजही तितक्याच सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्यापुढे तरुण अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतील. वर्षा यांच्या करिअरमधील एका फोटोशूटची खूप चर्चा झाली होती. वर्षा यांनी टॉपलेस फोटोशूट केलं होतं आणि त्या फोटोशूटमुळे कलाविश्वात खळबळ उडाली होती. एका इंग्रजी मासिकासाठी त्यांनी हे फोटोशूट केलं होतं. (Varsha Usgaonkar Topless Photoshoot)

‘हमाल दे धमाल’, ‘गंमत जंमत’, ‘लपंडाव’, ‘भुताचा भाऊ’ यांसारख्या मराठी चित्रपटांमधील वर्षा उसगांवकर यांचं काम प्रेक्षकांना आवडलं. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. ‘तिरंगा’, ‘दूध का कर्ज’, ‘घर आया मेरा परदेसी’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांनी एका इंग्रजी मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केलं होतं. मात्र त्यांचं हे फोटोशूट चाहत्यांना रुचलं नाही. त्यावेळी त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

१० वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक सध्या वर्षा उसगांवकर या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारत आहेत. जवळपास १० वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत त्यांनी काम केलं होतं. ‘सुख म्हणजे..’ मालिकेत वर्षा यांचा घरंदाज सासूचा अंदाज प्रेक्षकांना फारच आवडला आहे.

संबंधित बातम्या: वर्षा उसगावकरांच्या डान्ससमोर हर्षदा खानविलकरांच्या नृत्याची बिजली

संबंधित बातम्या: अभिज्ञा भावेच्या पतीला कॅन्सर; रुग्णालयातील फोटो आला समोर

संबंधित बातम्या: ‘ओला’ने प्रवास करताना शबाना आझमींच्या भाचीला आला भयानक अनुभव; वाचा नेमकं काय घडलं?

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.