AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासरच्यांनी केला छळ, पतीचा हॉस्पिटलचे बिल भरण्यास नकार…; वयाच्या 45व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचा मृत्यू

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चटर्जी यांनी एका मुलाखतीत आपली मुलगी पायल हिच्यावर सासरच्यांनी केलेल्या गैरवर्तनाचा आणि तिच्या वैद्यकीय उपचारांकडे केलेल्या दुर्लक्षाचा खुलासा केला.

सासरच्यांनी केला छळ, पतीचा हॉस्पिटलचे बिल भरण्यास नकार...; वयाच्या 45व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचा मृत्यू
BollywoodImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 06, 2025 | 7:04 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री मौसमी चटर्जी यांनी एक काळ गाजवला होता. त्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. मौसमी चॅटर्जी आणि त्यांचे पती जयंत मुखर्जी 2019 मध्ये पहिली मुलगी पायल गमावली. मधुमेहाशी दीर्घ लढाई लढल्यानंतर वयाच्या 45व्या वर्षी पायलचं निधन झालं. मृत्यूपूर्वी दोन वर्षे ती कोमामध्ये होती. त्या वेळी तिचं लग्न व्यवसायिक डिकी सिन्हा यांच्याशी झालं होतं. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मौसमी यांनी पायलच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, त्यांचं कुटुंब अजूनही या दु:खातून सावरलं नाही.

सासरच्यांवर मौसमी यांचे गंभीर आरोप

मौसमी यांनी माजी जावई डिकी सिन्हा यांच्याशी असलेल्या मतभेदांबद्दल मोकळेपणाने वक्तव्य केलं. इंडिया टुडेच्या एका जुन्या अहवालानुसार, दोन्ही कुटुंबांमध्ये एका व्यावसायिक सहकार्यावरून वाद झाला होता, ज्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. 2018 मध्ये मौसमी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पायलचे पालका म्हणून नियुक्तीची विनंती केली होती. त्यांनी डिकी आणि पायलच्या सासरच्यांवर तिच्या वैद्यकीय गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. वाचा: ६५ वर्षीय आजीचे २० वर्षीय तरुणावर प्रेम, सुनेने नको ते कृत्य करताना पकडलं अन्…

मौसमी यांनी असाही दावा केला की, पायलच्या सासरच्यांनी तिच्या वैद्यकीय बिल भरण्यासही नकार दिला आणि तिच्या आजारपणात त्यांना पायलला भेटण्यापासून अडवले. नयनदीप रक्षित यांना दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला वाटत नाही की माझे पती पायलच्या मृत्यूतून पूर्णपणे सावरले आहेत. मीही त्यातून सावरलेली नाही. हा रिकामेपणा आमच्या आयुष्यभर राहील.” आपल्या आजारी मुलीला भेटण्यासाठी न्यायालयात जाण्याच्या अनुभवाला त्यांनी “छळ” असे म्हटले. त्यांनी सांगितलं की, या घटनेने त्यांची धाकटी मुलगी मेघा चटर्जी आणि तिच्या पतीवरही परिणाम झाला, ज्यांचा कथितरीत्या पायलच्या सासरच्यांनी “अपमान” केला.

पायलच्या मृत्यूचा मोठा झटका

मौसमी म्हणाल्या, “आम्ही या दु:खातून सावरू शकलेलो नाही. जेव्हा एखादं मूल मरतं, तेव्हा कोणीही त्यातून सावरू शकत नाही. पायल आणि मेघाचे नाते खूप घट्ट होते, कारण त्यांच्या वयात आठ वर्षांचं अंतर होतं.” पायलच्या मृत्यूनंतर जयंत यांच्या भावनिक अवस्थेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “कधी कधी तो रात्री उठून पायलचं नाव घ्यायचा. या गोष्टी शब्दांत व्यक्त करता येत नाहीत.” सासरच्यांचे मौसमी यांच्यावर आरोप

स्पॉटबॉयला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत डिकी म्हणाला होता, “मौसमी यांनी पायलच्या मृत्यूनंतर तिचा चेहराही पाहिला नाही. त्या अंत्यसंस्काराला आल्या नव्हत्या; त्या शवागारातही आल्या नाहीत.” मात्र, नुकत्याच झालेल्या मुलाखतीत मौसमी यांनी याचा खंडन केले आणि सांगितलं की, त्या खरंच पायलच्या मृत्यूनंतर शवागारात गेल्या होत्या. त्यांनी असाही खुलासा केला की, पायलचं शव शवागारात ठेवण्यात आलं होतं, कारण रुग्णालयाचं बिल भरलं गेलं नव्हतं. त्या म्हणाल्या, “जेव्हा ती गेली, तेव्हा मी रुग्णालयात गेले होते. तिला शवागारात ठेवलं होतं, कारण रुग्णालयाचं बिल भरलं गेलं नव्हतं. मी त्या सगळ्या त्रासाला सामोरं गेले.” मौसमी पुढे म्हणाल्या, “या गोष्टींमधून तुम्हाला समजतं की, या पृथ्वीवर किती प्रकारची माणसं असतात.”

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.