कतरिनाच्या आधी या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता विकी कौशल; नात्यात कतरिनामुळे दुरावा? ब्रेकअपच्या 6 वर्षानंतरही अभिनेत्री सिंगल
अनेकदा बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींचे ब्रेकअप हा चर्चेचा मुद्दा बनतो. अशाच एका जोडीची चर्चा झाली होती ती म्हणजे विकी कौशल आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड. आजही या जोडीची चर्चा तेवढीच केली जाते. विकी कौशल कतरिनाच्या आधी एका अभिनेत्रीच्या प्रेमात अखंज बुडाला होता.पण कतरिनामुळे त्यांच्या नात्यात फूट पडल्याचं बोललं जातं.

प्रत्येक प्रेमकथेचा शेवट हा चांगलाच होतो असं नाही. बॉलिवूडमध्ये हे बऱ्याचदा पाहायला मिळतं. स्टार्स एकमेकांच्या प्रेमात बुडतात. ते त्यांचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत, पण अचानक बातमी येते की त्यांचं ब्रेकअप झालं आहे. पण नंतर समजतं की त्यांच्या आयुष्यात दुसऱ्याच कोणीतरी एन्ट्री केली आहे. पण अजून एक गोष्ट या नात्यामध्ये बघायला मिळाली आहे की दोघांपैकी एकजण लगेच यातून बाहेर पडतो तर एकजण अजूनही तिथेच गुंतून राहतो.
ब्रेकअपनंतर विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड होती डिप्रेशनमध्ये
अशीच एक जोडी म्हणजे विकी कौशल आणि त्याची एक्स प्रेयसी. पण ही प्रेयसी म्हणजे कतरिना नाही. तर कतरिनाच्या आधी विकी एका दुसऱ्याच अभिनेत्रीच्या प्रेमात होता. दोघेही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करायचे. त्यांचे नाते हे बऱ्यापैकी सर्वांना माहित होते. पण जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसला होता. विकी कौशल कतरिनासोबत त्याचं एक वेगळं आयुष्य जगतोय.आनंदी वैवाहिक जीवन जगतोय. पण ब्रेकअपनंतर ही अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली आणि आजही ती सिंगलच आहे.
दोघांनीही कधीही त्यांचे प्रेम लपवले नाही
ही अभिनेत्री म्हणजे हरलीन सेठी आहे. दोघांनीही कधीही त्यांचे प्रेम लपवले नाही. दोघेही उघडपणे एकमेकांना पाठिंबा देताना दिसले. एक काळ असा होता जेव्हा हरलीन सेठीने त्याच्या मनावर राज्य केले. हरलीनने अनेक ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम केले. ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’ ही तिची सर्वात आवडती वेब सिरीज आहे, ज्यामध्ये ती विक्रांत मेस्सीसोबत दिसली होती. या मालिकेच्या प्रमोशन दरम्यान, विकी तिला पाठिंबा देण्यासाठी आला होता आणि ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ दरम्यान, हरलीन त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करत होती.
एकत्र वेळ घालवायचे
जेव्हा हरलीन आणि विकीची लव्ह स्टोरी सुरू झाली तेव्हा दोघेही ते एन्जॉय करत होते. मात्र, जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्यांचे प्रेम कसे संपले यावर लोकांना विश्वासच बसत नव्हता. विकी कौशलने नेहमीच त्याचे आणि हरलीनचे नाते सर्वांसमोर ठेवले, परंतु तो कधीही ब्रेकअपबद्दल बोलले नाही. तो नेहमीच यावर गप्प राहिला. तो अनेकदा म्हणायचा की तो एका सुंदर मुलीसोबत आहे, तो हावभावांमध्ये हरलीनचा उल्लेखही करायचा. विकी आणि हरलीनची पहिली भेट एका पार्टीत झाली आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. विकीने स्वतः सांगितले की जेव्हा त्याने हरलीनला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला आणि तिच्यासोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत असे.
View this post on Instagram
ब्रेकअपमुळे अभिनेत्री निराश झाली होती
2019 च्या सुमारास ब्रेकअपची बातमी आली, जरी दोघांनीही कधीही याचे कारण उघडपणे सांगितले नाही. हरलीनने एकदा म्हटले होते की ती ब्रेकअपमुळे ती अजिबात नाराज नाही. फक्त लोक तिला विकीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नावाने ओळखतात किंवा तिच्या चर्चा करतात हे तिला अस्वस्थ करते, असं तिने म्हटलं आहे.
कतरिनाच्या येण्यामुळे दोघांचे नाते दुरावले?
विकी आणि हरलीनचे ब्रेकअपची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा हरलीनने अचानक तिच्या इंस्टाग्रामवरून विकीला अनफॉलो केले. त्यावेळी विकी आणि कतरिना कैफ यांच्यातील जवळीकतेच्या बातम्याही येत होत्या आणि असे म्हटले जाते की कतरिनाच्या येण्यामुळे हरलीनने विकीपासून स्वतःला दूर केले. यानंतर ती खूप निराश झाली आणि डिप्रेशनमध्येही गेली होती. बराच काळ ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकली नव्हती. पण तिने आता स्वत:ला सावरलं आहे. ती तिच्या करिअरवर लक्ष देताना दिसते. मात्र ती आजही सिंगल, अविवाहित आहे.
