AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Vicky | “पार्टनर म्हणून मलाच का निवडलं?”; विकी कौशलच्या प्रश्नावर कतरिनाने दिलं हे उत्तर

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता विकी कौशल त्याची पत्नी कतरिना कैफबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. लग्नापूर्वी एकमेकांना डेट करत असताना विकीने कतरिनाला विचारलं होतं की, 'मीच का?' त्यावर तिने काय उत्तर दिलं, याचा खुलासा विकीने केलं.

Katrina Vicky | पार्टनर म्हणून मलाच का निवडलं?; विकी कौशलच्या प्रश्नावर कतरिनाने दिलं हे उत्तर
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2023 | 10:57 AM
Share

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. मात्र कतरिना आणि विकी जेव्हा एकमेकांना डेट करू लागले, तेव्हा हे नातं लग्नापर्यंत न्यायचं असा विचार दोघांनीही केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने कतरिनासोबतच्या लग्नाविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. कतरिना आपल्याकडे एवढं लक्ष का देतेय, याचं सुरुवातीला आश्चर्य वाटल्याचंही त्याने कबूल केलं.

लग्नाबद्दल विकी कौशल व्यक्त

“ज्यावेळी आम्ही एकमेकांना डेट करत होतो, तेव्हा जर मी तिला लग्नासाठी विचारलं असतं तर त्यावर तिचं उत्तर काय असतं, ते मला नीट ठाऊक होतं. अगदी नात्याच्या सुरुवातीपासूनच आम्ही दोघं त्याबद्दल गंभीर होतो. आम्हाला हे नातं कायमचं हवं होतं. लग्न हा एकीकडून विचारला जाणारा प्रश्न आणि दुसरीकडून दिलं जाणारं उत्तर नव्हतं. आमच्यासाठी ती एक चर्चा होती”, असं विकी कौशल म्हणाला. मात्र कतरिनाला लग्नासाठी प्रपोज करण्यापूर्वी विकीच्या मनात काही शंका होत्या.

कतरिनाच्या प्रेमात का पडलो?

याविषयी तो पुढे म्हणाला, “मी तिची लोकप्रियता किंवा स्टेटस पाहून प्रेमात पडलो नाही. एक व्यक्ती म्हणून ती कशी आहे, हे जाणून घेतल्यानंतर मी तिच्या प्रेमात पडलो. मी तुला डिनरला घेऊन जाऊ शकतो का, असा साधा प्रश्न मी तिला विचारला होता. सुरुवातीला मला हा प्रश्न पडायचा की, मीच का? माझ्यासोबत हे काय घडतंय? पण जसजसं मी तिला ओळखू लागलो, तसतसं मला ती व्यक्ती म्हणून खूप आवडू लागली.”

“तुला मीच का आवडतो?”

“मी तुला का आवडतो”, असा प्रश्नही विकीने सुरुवातीला कतरिनाला विचारला होता. त्यावर ती त्याला म्हणाली, “तुझी काही नीतीमूल्ये आहेत, जी मला फार आवडतात आणि त्या मूल्यांबाबत तू फार हट्टी आहेस. तू तुझ्या मूल्यांचं रक्षण करतो आणि हीच गोष्ट मला तुझ्याबाबत फार आवडते.”

विकी कौशल लवकरच ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि ‘सॅम बहादूर’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर कतरिनाचा ‘टायगर 3’ हा चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती सलमान खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.