Katrina Kaif-Vicky Kaushal | विकी कौशल – कतरिना गेले फिल्म डेटवर, शेअर केला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा रिव्ह्यू, आलियाचा पिक्चर पाहून काय म्हणाली कतरिना ?
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहेत. नुकतेच ते दोघे फिल्म बघायला गेले होते. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचा रिव्ह्यूही त्यांनी शेअर केला

Vicky-Katrina Review : रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असून आलिया आणि रणवीर दोघेही फिल्मचे जोरदार प्रमोशन करत आहेत.
दरम्यान मंगळवारी मुंबईत या चित्रपटाचे स्पेशन स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते, ज्यासाठी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही उपस्थित होते. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहेत. हे दोघेही या चित्रपटाच्या स्क्रीनिंगासाठी आले होते. चित्रपट पाहून झाल्यावर बाहेर पडताना फोटोग्राफर्सनी त्या दोघांना गराडा घातला. आणि चित्रपट कसा वाटला तेही विचारले.
आलियाचा पिक्चर पाहून काय म्हणाली कतरिना ?
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट पाहून बाहेर आल्यावर विकी आणि कतरिना दोघेही कारच्या दिशेने निघाले होते. तेव्हा फोटोग्राफर्सनी त्यांना चित्रपट कसा वाटला त्याबद्दल विचारले. त्यावर विकी कौशलने उत्तर दिले की – (चित्रपट) खूप छान होता. तर कतरिनानेही – अमेझिंग मूव्ही असे म्हणत आलिया भट्ट – रणवीर सिंगच्या या चित्रपटाचे कौतुक केले.
View this post on Instagram
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट खूप चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट धमाका करणार असल्याचे सांगितल जाते. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे मोठे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत.
