AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, भर पार्टीतच अभिनेत्रीने..

जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते. जान्हवी कपूर सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आलीये.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल, भर पार्टीतच अभिनेत्रीने..
Shikhar Pahariya and Janhvi Kapoor
| Updated on: Jun 02, 2024 | 3:00 PM
Share

बोनी कपूर यांची लेक आणि बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. हेच नाही तर जान्हवी कपूर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर दिसते. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही जान्हवी कपूर दिसतंय. मुलाखतीमध्ये आपल्या पर्सनल लाईफबद्दल खुलासा करतानाही जान्हवी कपूर दिसली.

जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करतंय. हेच नाही तर जान्हवी कपूर आणि शिखर रिलेशनमध्ये असल्याचे स्वत: बोनी कपूर यांनी सांगितले. हेच नाही तर ते लग्न करणार की, नाही हे पुढील वेळेत कळेल, असेही बोनी कपूर यांनी म्हटले होते. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया कायमच एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. विदेशातही दोघे फिरताना दिसले आहेत.

आता जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ अंबानीच्या प्री वेडिंग पार्टीतील आहेत. अंबानीची प्री वेडिंग पार्टी काल संपलीये. अनंत अंबानी आणि राधिकाच्या या प्री वेडिंग पार्टीसाठी खास लोकांना आमंत्रण देण्यात आले होते.

विशेष म्हणजे या पार्टीत जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत पोहचली होती. या पार्टीत पाहुण्यांसाठी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली. अंबानींच्या भर पार्टीत जान्हवी कपूर ही शेजारी उभा असलेल्या शिखर पहाडिया याला खाऊ घालताना दिसतंय. आता हेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

भर पार्टीत रोमांन्स करताना जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे दिसले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील जामनगर येथे प्री वेटिंग फंक्शन झाले. त्यानंतर क्रूझवर हे दुसरे प्री वेडिंग झाले. विशेष म्हणजे आता या प्री वेडिंगमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न मुंबईमध्ये होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान