AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जान्हवी कपूर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाच्या प्रेमात, अखेर अभिनेत्रीने गळ्यात..

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जान्हवी कपूर सध्या तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरचा काही दिवसांपूर्वी बवाल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

जान्हवी कपूर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाच्या प्रेमात, अखेर अभिनेत्रीने गळ्यात..
Janhvi Kapoor
| Updated on: May 10, 2024 | 3:50 PM
Share

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वी बवाल हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत असल्याचे सांगितले जाते. अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट देखील होतात. मात्र, शिखर पहाडिया किंवा जान्हवी कपूर यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधी काही भाष्य केले नाही.

मध्यंतरी चर्चा होती की, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी सर्वांच्या गुपचूप साखरपुडा केला. मात्र, त्यावर खुलासा नाही होऊ शकला. आता नुकताच एका शोमध्ये जान्हवी कपूर ही पोहचली. यावेळी जान्हवी कपूर हिने घातलेल्या सिल्वर रंगाच्या पेंडेटकडे सर्वांच्या नजरा दिसल्या. अत्यंत खास असे पेंडेट जान्हवी कपूर हिने गळ्यात घातल्याचे दिसले.

जान्हवी कपूर हिने गळ्यात शिकू नावाचे पेंडेट घातले. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर ही करण जोहर याच्या शोमध्ये पोहचली होती. जान्हवी कपूर त्यावेळी म्हणाली होती की, शिखर पहाडिया याला ती प्रेमात शिकू म्हणते. आता शिखर पहाडिया याच्याच नावाने थेट पेंडेट गळ्यात घालून जान्हवी कपूर ही एका शोमध्ये पोहचली.

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी जरी त्यांच्या रिलेशनवर कधी काही भाष्य केले नसले तरीही ते गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवी कपूर ही काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसली होती. हेच नाही तर शिखर पहाडिया हा बोनी कपूर यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच विमानतळावर स्पाॅट झाला.

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. विशेष म्हणजे शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांचे शिक्षणची एकसोबतच झाले आहे. शिखर पहाडिया हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. मात्र, शिखर आणि जान्हवी यांनी त्यांचे रिलेशन अजून ऑफिशियल केले नाहीये.

Follow Us
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त