तू पॉर्न पाहतेस का? सेक्सशी संबंधित प्रश्नावर विद्या बालनचं बिनधास्त उत्तर

| Updated on: Apr 27, 2024 | 1:14 PM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री विद्या बालन अशा मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली, ज्यावर सहसा सेलिब्रिटी मोकळेपणे बोलणं टाळतात. तू अडल्ट फिल्म पाहतेस का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.

तू पॉर्न पाहतेस का? सेक्सशी संबंधित प्रश्नावर विद्या बालनचं बिनधास्त उत्तर
Vidya Balan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री विद्या बालनचा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये तिने अभिनेता प्रतीक गांधीसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत विद्या विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. पॉर्न फिल्म्स आणि सेक्ससंदर्भातही तिने बिनधानस्तपणे तिचे विचार मांडले. ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ या मुलाखतीत विद्याला पॉर्न फिल्म्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तू पॉर्न फिल्म्स पाहतेस का, असा सवाल मुलाखतकर्त्याने विद्याला केला.

यावर उत्तर देताना विद्या म्हणाली, “खरं सांगायचं झालं तर मला कधीच पॉर्न ही संकल्पना पटली नाही. कारण दोन लोकांचे शारीरिक संबंध पहायला मला आवडत नाही किंबहुना मला ते पहायचंच नाही. जर एखाद्या चित्रपटातील असा सीन असेल किंवा त्याला संवेदनशील पद्धतीने शूट केलं असेल, त्या सीनमागे चांगली कथा असेल तर मला पहायला काहीच समस्या नाही. पण मी स्वत: कधी असं ठरवून पॉर्न पाहिलेला नाही. जे काही एक-दोन सीन्स पाहिले असतील, त्यातून मला इतकंच वाटलं की अशा फिल्म्समध्ये फक्त स्त्रियांना एका शरीराच्या रुपात दाखवलं जातं. त्यात कोणतीच कथा नसते, फक्त संभोग असतो. त्यामुळे असे सीन्स पाहून मी कधीच ‘टर्न ऑन’ होऊ शकत नाही. म्हणूनच मला पॉर्न पहायला आवडत नाही.”

हे सुद्धा वाचा

‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्याने सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. यात तिने बरेच बोल्ड सीन्स दिले होते. या भूमिकेसाठी तिला वजन वाढवावं लागलं होतं. याआधीच्या अनेक मुलाखतींमध्ये विद्या ‘बॉडी शेमिंग’बद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. त्यालाच अनुसरून शारीरिक नात्यात काही बदल झाला का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. याविषयी बोलताना विद्या पुढे म्हणाली, “मी इंटिमसीचा नेहमीच आनंद घेतला आहे. माझ्या पसंतीविषयी मी अधिकाधिक ओळखण्याचा प्रयत्न केला आहे.” यानंतर विद्या मस्करीत म्हणते, “मी नेहमी अशाच ठिकाणी आपला आवाज उठवते, जिथे त्याचं खरंच महत्त्व असेल.”

याच मुलाखतीत विद्या बालनला विचारलं गेलं की, पैशांमुळे कधी तिचं नातं बदललं का? त्यावर विद्या म्हणाली, “मला पैशांवर प्रेम आहे. मला पैशांविषयी एक नवीन गोष्ट समजली आहे. ती म्हणजे जितकं तुम्ही स्वत:वर प्रेम कराल, तितकं तुम्ही स्वत:कडे पैसे आकर्षित कराल. म्हणूनच मी पैशांवर प्रेम करते, कारण मी स्वत:वर खूप प्रेम करते.”