AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Devarakonda | तो धावत येताच विजय देवरकोंडा दचकून मागे पळाला.. भर कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी कार्यक्रमातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. 'कोणत्याच सेलिब्रिटीसोबत असं वागणं योग्य नाही', असं एकाने लिहिलं. तर 'विजयचा खरा चाहता असं कधीच वागणार नाही', असं दुसऱ्याने म्हटलंय.

Vijay Devarakonda | तो धावत येताच विजय देवरकोंडा दचकून मागे पळाला.. भर कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल
Vijay DeverakondaImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 19, 2023 | 7:37 PM
Share

हैदराबाद | 19 जुलै 2023 : अभिनेता विजय देवरकोंडा हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘गीता गोविंदम’, ‘अर्जुन रेड्डी’ यांसारख्या चित्रपटांनंतर त्याचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. विजयचा भाऊ आनंद देवरकोंडाच्या ‘बेबी’ या चित्रपटाच्या यशानंतर टीमकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला विजयने हजेरी लावली होती. मात्र तो मंचावर बोलत असताना अशी गोष्ट घडली, ज्यामुळे विजय खूप घाबरला आणि दचकून तो मागे पळाला. विजयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

पापाराझी अकाऊंटवर विजयचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये विजय स्टेजवर माइक घेऊन बोलताना दिसत आहे. त्याच्यामागे इतर पाहुणे उपस्थित आहेत. मात्र अचानक तेव्हा एक अतिउत्साही चाहता धावत स्टेजवर येतो. स्टेजवर तो चाहता विजयच्या पाया पडण्यासाठी येतो. मात्र हे कळण्याआधीच विजय घाबरून मागे पळतो. हे सर्व काही अवघ्या काही क्षणांमध्ये घडतं. तितक्यात सुरक्षारक्षक मंचावर येतात आणि त्या चाहत्याला तिथून घेऊन जातात.

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी कार्यक्रमातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘कोणत्याच सेलिब्रिटीसोबत असं वागणं योग्य नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘विजयचा खरा चाहता असं कधीच वागणार नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

पहा व्हिडीओ

बेबी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन साई राजेश नीलम यांनी केलं असून श्रीनिवास कुमार नायडू यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामध्ये आनंद देवरकोंडाशिवाय वैष्णवी चैतन्य आणि विराज अश्विन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.

विजय आगामी ‘खुशी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत समंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत आहे. या दोघांनी आधी ‘महानटी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. शिवा निर्वाणा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या गाण्यात विजय आणि समंथा यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळाली. या चित्रपटानंतर समंथा अभिनयातून काही काळ ब्रेक घेऊन तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.