AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 नेटवर्कचे CEO बरुण दास यांचा नवा कोरा OTT ‘ड्युओलॉग’, विजय देवराकोंडासोबत लाइगरनिमित्त खास बातचित

TV9 नेटवर्कचे MD आणि CEO बरुण दास यांचा नवा कोरा OTT शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ड्युओलॉग असं या कार्यक्रमाचं नाव आहे. यात काही कलाकारांच्या मुलाखती पाहायला मिळणार आहेत.

TV9 नेटवर्कचे CEO बरुण दास यांचा नवा कोरा  OTT 'ड्युओलॉग', विजय देवराकोंडासोबत लाइगरनिमित्त खास बातचित
| Edited By: | Updated on: Aug 27, 2022 | 11:47 AM
Share

मुंबई : TV9 नेटवर्क सातत्याने काही नव्या गोष्टी करत असतं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं. आताही असाच एक नवा प्रयोग TV9 नेटवर्क करतंय. TV9 नेटवर्कचे MD आणि CEO बरुण दास (Barun Das) यांचा नवा कोरा OTT शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ड्युओलॉग असं या कार्यक्रमाचं नाव आहे. यात काही कलाकारांच्या मुलाखती पाहायला मिळणार आहेत. ही काही खास निवडक मुलाखतींची मालिका असेन. या कार्यक्रमाची सुरुवात एका खास मुलाखतीने झाली. ‘लाइगर’ या सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Devarakonda) याच्यासोबत बातचित करण्यात आली.

“ड्युओलोग म्हणजे एक असा शो ज्यामध्ये सेलिब्रिटींचं जगणं सर्वांसमोर येईल. त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि करिअरमधील उतार चढाव पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम आधीच्या कार्यक्रमांपेक्षा वेगळा आहे. पठडीच्या बाहेरचे प्रश्न कलाकारांचं आयुष्य उलगडून दाखवलं जाणार आहे. आमच्या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणे हा कार्यक्रम एकतर्फी नसेल तर ती विचारांची उत्तम देवाणघेवाण असेल. माझ्यासाठी ही भूमिका स्वीकारणं तितकंस सोपं नव्हतं. पण ती स्विकारण्यामागे लोकांचं व्यक्तीमत्व उलगडण्याचा हेतू होता. भारताच्या विकासाच्या टप्प्यावरचा महत्वाचा भाग असेल. सेलिब्रिटींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हेतू असेल. हा कार्यक्रम लोकप्रिय ठरेल यासाठी मी आणि टीव्ही 9 नेटवर्कची टीम प्रयत्नशील असेल”, असं बरुण दास यांनी सांगितलं.

“मला कार्यक्रम आवडला. हा कार्यक्रम माहितीपर आहे. मुलाखतींमधून बऱ्याच गोष्टी लोकांसमोर येतील. या कार्यक्रमाने लोकप्रियतेची सगळी शिखरं पार करावीत अन् समाजमनावर आपला ठसा उमटवावा, अश्याच मी सदिच्छा देईल, असं चोप्रा फाउंडेशनचे सीईओ पूनाचा मचाय्या यांनी म्हटलंय.

हा कार्यक्रम कुठे पाहता येईल?

CEO बरुण दास यांचा नवा कोरा OTT शो iOS ॲप स्टोअर आणि Google Play Store तसेच वेबवर उपलब्ध असलेल्या News9 Plus अॅपवर पाहायला मिळणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.