Kaavaalaa Song | बिग बॉसच्या घरात गर्लफ्रेंड तमन्नाच्या ‘कावाला’ गाण्यावर विजय वर्माचा भन्नाट डान्स

सूत्रसंचालक सलमान खान आणि कॉमेडियन भारती सिंग यांच्यासोबत श्वेता आणि विजयने बिग बॉसच्या सेटवर धमाल केली. मात्र या सगळ्यांच लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे गर्लफ्रेंड तमन्ना भाटियाच्या गाण्यावर विजयने धरलेला ठेका.

Kaavaalaa Song | बिग बॉसच्या घरात गर्लफ्रेंड तमन्नाच्या कावाला गाण्यावर विजय वर्माचा भन्नाट डान्स
गर्लफ्रेंड तमन्नाच्या गाण्यावर विजय वर्माने धरला ठेका
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2023 | 10:10 AM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. या शोचा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. प्रत्येक आठवड्यानुसार प्रेक्षकांमध्ये शोबद्दलची उत्सुकता अधिकाधिक वाढताना दिसतेय. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि अभिनेता विजय वर्मा यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. ‘कालाकूट’ या त्यांच्या आगामी सीरिजचं प्रमोशन करण्यासाठी ते बिग बॉसच्या घरात पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत कॉमेडियन भारती सिंगसुद्धा होती.

गर्लफ्रेंडच्या गाण्यावर विजय वर्माचा डान्स

सूत्रसंचालक सलमान खान आणि कॉमेडियन भारती सिंग यांच्यासोबत श्वेता आणि विजयने बिग बॉसच्या सेटवर धमाल केली. मात्र या सगळ्यांच लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे गर्लफ्रेंड तमन्ना भाटियाच्या गाण्यावर विजयने धरलेला ठेका. तमन्नाच्या ‘जेलर’ या चित्रपटातील ‘कावाला’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान हिट होत आहे. या गाण्यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण डान्सचे व्हिडीओ शूट करून पोस्ट करत आहेत.

विजयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिग बॉसच्या सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. सलमान, भारती आणि श्वेतासोबतच्या त्याच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. यातील एका फोटोमध्ये विजय तमन्नाच्या गाण्याची ‘हुक स्टेप’ करताना दिसतोय.

बिग बॉसच्या या खास एपिसोडमध्ये विजय आणि श्वेताना घरातील स्पर्धकांना एक टास्क दिला होता. ‘FIR’ टास्क असं नाव त्याला दिलं गेलं. या टास्कदरम्यान घरातील स्पर्धकांना त्यांच्यातील गुन्हेगार शोधायचा होता आणि त्याच्याविरोधात बिग बॉसकडे एफआयआर दाखल करायचा होता. यंदाचा वीकेंड का वार हा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल डोस घेऊन आला होता. कारण यावेळी सलमानसोबत कॉमेडियन भारती सिंगने मंचावर खूप धमाल केली. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसोबत ती विविध खेळसुद्धा खेळली. घरात प्रवेश करण्यापूर्वी तिने सलमानसोबत डान्ससुद्धा केला होता.

श्वेता आणि विजयच्या ‘कालाकूट’ या सीरिजची कथा एका पोलीस अधिकाऱ्या आयुष्याभोवती फिरते. ज्यावेळी तो राजीनामा द्यायचा विचार करतो त्याचवेळी त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक केस त्याच्या पदरी पडते. जिओ सिनेमावर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.