AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijayendra Kumeria : 10 वर्षांचा संसार मोडकळीस, चार वर्षांपूर्वी काडीमोड; लोकप्रिय अभिनेत्याचा घटस्फोटाबद्दल खुलासा

Vijayendra Kumeria : टीव्ही अभिनेता विजयेंद्र कुमेरियानं नुकत्याच एका मुलाखतीत घटस्फोटाबद्दल भाष्य केलं असून चार वर्षांपूर्वी अभिनेता पत्नीपासून विभक्त झाल्याचं समोर आलं आहे.

Vijayendra Kumeria : 10 वर्षांचा संसार मोडकळीस, चार वर्षांपूर्वी काडीमोड; लोकप्रिय अभिनेत्याचा घटस्फोटाबद्दल खुलासा
| Updated on: Oct 06, 2026 | 5:44 PM
Share

सिनेइंडस्ट्रीतून कलाकारांच्या लग्नाच्या तसेच घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असतात. अशातच आता एका अभिनेत्यानं त्याच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. टीव्ही अभिनेता विजयेंद्र कुमेरियानं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल महत्वपूर्ण खुलासा केला आहे. ‘उडान’ फेम अभिनेत्यानं एका मुलाखतीत सांगितलं की, त्याचा प्रीती भाटियासोबत चार वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. या जोडप्याला किमाया नावाची मुलगी आहे. लग्नाच्या दहा वर्षांनी विजयेंद्र आणि प्रीती यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

लग्नाच्या दहा वर्षांनी घटस्फोट

चार वर्षांनंतर, विजयेंद्र कुमेरियानं झूमला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, तो आणि प्रीती गेल्या चार वर्षांपासून विभक्त झाले आहेत. यापूर्वी, २०२३ मध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी, प्रीती भाटियानं या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला होता. आता अभिनेत्यानं स्वतः घटस्फोटाबद्दल माहिती दिली आहे.

विजयेंद्र आणि प्रीती यांची मुलगी किमायाचा जन्म २०१६ मध्ये झाला. प्रीती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या मुलीसोबतचे फोटो शेअर करते. २०२४ मध्ये, किमायाच्या वाढदिवसानिमित्त, तिनं आपल्या मुलीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. मात्र, प्रीतीच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर विजयेंद्रसोबतचे फोटो क्वचितच दिसतात.

विजयेंद्र आणि प्रीतीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं

जेव्हा त्यांच्या विभक्त होण्याची बातमी समोर आली, तेव्हा विजयेंद्र आणि प्रीतीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. प्रीती विजयेंद्रच्या प्रोडक्शन कंपनी, कुमेरिया प्रोडक्शन्सशी देखील जोडली गेली होती. मात्र, ती अजूनही कंपनीसोबत काम करत आहे की नाही, हे सध्या अस्पष्ट आहे. २०२१ मध्ये एका मुलाखतीदरम्यान, विजयेंद्रनं पत्नीचं कौतुक केलं होतं.

विजयेंद्रने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे

दरम्यान, विजयेंद्र कुमेरिया एक लोकप्रिय टीव्ही अभिनेता असून तो ‘शास्त्री सिस्टर्स’, ‘उडान’, ‘नागिन 4’ ‘दीवानियत’, आणि ‘जागृती: एक नई सुबह’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसला आहे. तो सध्या ईशा सिंगसोबत ‘जुही मुई’ या मालिकेत इन्स्पेक्टर श्याम सिंगची भूमिका साकारत आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी